IND vs NZ : Kanpur Test पूर्वी खेळाडू केवळ 3 दिवस क्वारंटाईन राहणार, जाणून घ्या कारण
उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील ग्रीन पार्कमध्ये (Green Park) 25 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू पुढील आठवड्यात कानपूरला पोहोचणार आहेत.
मुंबई : उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील ग्रीन पार्कमध्ये (Green Park) 25 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी सामन्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू पुढील आठवड्यात कानपूरला पोहोचणार आहेत. लँडमार्क हॉटेलमध्ये खेळाडूंच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली असून, येथे 70 खोल्या आधीच बुक करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंना क्वारंटाईन करावे लागणार आहे. मात्र आता त्यांना सात नव्हे तर तीन दिवस क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार असून या काळात ते कोणालाही भेटणार नाहीत किंवा मैदानात सरावही करणार नाहीत. (Team India will have to be quarantined itself for 3 days in Kanpur Before IND vs NZ Test)
मिळालेल्या माहितीनुसार, कसोटी खेळणाऱ्या भारतीय खेळाडूंना सात ऐवजी फक्त तीन दिवस क्वारंटाईन केले जाईल. कर्णधार आणि उपकर्णधारासह 11 खेळाडू 16 ऐवजी 19 नोव्हेंबरला कानपूरला पोहोचतील आणि थेट हॉटेल लँडमार्कमध्ये जातील. जिथे ते तीन दिवस त्यांच्या खोलीत राहणार आहेत. तीन दिवस ते खोलीतून बाहेर पडू शकणार नाहीत, किंवा मैदानावर सरवादेखील करु शकणार नाहीत. यासाठी बीसीसीआयने यूपीसीएला नवीन आदेश पाठवले असून त्याअंतर्गत तयारी सुरू आहे. खरे तर नवीन नियम पाहता शनिवारी सायंकाळी उशिरा ही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.
टीम इंडियाचे 11 खेळाडू क्वारंटाईन होणार
या अंतर्गत कर्णधार अजिंक्य रहाणे, उपकर्णधार चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, वृद्धिमान साहा, केएस भरत, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव आणि पी. कृष्णा 19 नोव्हेंबरला कानपूरला पोहोचतील. मीडिया रिपोर्ट्सनुसार, UPCA नोडल ऑफिसर अनिल कमथान यांनी सांगितले की, आता सहा ऐवजी 11 भारतीय खेळाडू येतील आणि त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जाईल. हे सर्व खेळाडू टी-20 खेळण्याआधी पोहोचतील.
युपीसीएच्या अधिकाऱ्यांकडून मैदानाची पाहणी
दुसरीकडे, यूपी क्रिकेट असोसिएशनने (UPCA) 25 नोव्हेंबरला ग्रीनपार्कमध्ये होणारा सामना संस्मरणीय बनवण्यासाठी जवळपास सर्व तयारी पूर्ण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी स्टेडियमची पाहणी करण्यासाठी आलेले संचालक रियासत अली म्हणाले की, हा एक संस्मरणीय सामना असेल आणि ग्रीनपार्क इतिहास घडवेल. त्यांनी संचालक, व्हीआयपी, मीडिया आणि न्यू प्लेयर पॅव्हेलियनमध्ये सुरू असलेल्या कामांची पाहणी करून स्टेडियमची प्रत्येक गॅलरी आणि मंडप सुशोभित करण्यात येत असल्याचे सांगितले.
इतर बातम्या
न्यूझीलंड ऑस्ट्रेलियाची मॅच, भारत पाकिस्तानसारखी का होते? काय आहे स्पेशल कारण??
विराट कोहलीने ODI आणि Test टीमच्या कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त व्हावं : शाहिद आफ्रिदी
(Team India will have to be quarantined itself for 3 days in Kanpur Before IND vs NZ Test)