IND vs AUS : ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी टीम इंडियाची तारीख ठरली! रोहित शर्मा जाणार की नाही?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या भारताच्या आशा आता ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेवर अवलंबून आहे. भारताला पाच सामन्यांची कसोटी मालिका 4-0 ने जिंकणं भाग आहे. 22 नोव्हेंबरला पहिला कसोटी सामना असणार आहे. भारताने आता या मालिकेसाठी जय्यत तयारी केली आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियात जाण्यासाठी टीम इंडियाची तारीख ठरली! रोहित शर्मा जाणार की नाही?
Follow us
| Updated on: Nov 08, 2024 | 5:19 PM

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेची तारीख आता जवळ येत चालली आहे. न्यूझीलंडविरुद्धची मालिका 3-0 ने गमावल्यानंतर आता उरल्यासुरल्या आशा याच मालिकेवर अवलंबून आहेत. भारताला ही मालिका काही करून 4-0 ने जिंकणं भाग आहे. पण भारतीय संघाला ऑस्ट्रेलियन भूमीवर अडचणींचा सामना करावा लागणार यात शंका नाही. न्यूझीलंडविरुद्ध मालिका गमवल्याने आधीच मनोबल खचलं आहे. त्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीचं गणित किचकट झालं आहे. त्यामुळे भारतीय संघ दबावात असणार यात शंका नाही. पण तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी भारतीय संघ जाणार तरी कधी असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला होता. आता प्रश्नाचं उत्तर मिळालं असून दोन गटात भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, टीम इंडिया 10 आणि 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. लॉजिस्टिक अडचणींमुळे संपूर्ण संघासाठी एकच व्यावसायिक उड्डाणाची व्यवस्था करणं अशक्य झालं आहे. या तारखा समोर आल्या असल्या तरी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

भारतीय संघासोबत रोहित शर्मा जाणार की नाही याबाबत साशंकता आहे. कारण पहिल्या कसोटीत खेळेल की नाही याबाबत त्याला पत्रकार परिषदेत विचारलं असता त्याने काही स्पष्ट सांगितलं नाही. त्यामुळे त्याच्या विधानावरून बराच गोंधळ झाला होता. त्यामुळे संघासोबत जाणार नसेल तर कर्णधारपदाची धुरा दुसऱ्या खेळाडूच्या खांद्यावर टाकावी, असा सल्ला माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी दिला होता. दरम्यान, भारतीय संघाला ऑस्ट्रेलियातील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी लवकर जाणं भाग आहे. अन्यथा परिस्थितीशी जुळवून घेण्यात वेळ जाईल त्याचा परिणाम कसोटी मालिकेवर होऊ शकतो.

भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेळापत्रक

  • पहिली कसोटी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (22 ते 26 नोव्हेंबर) पर्थ स्टेडियम, पर्थ
  • दुसरी कसोटी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (6 ते 10 डिसेंबर) ॲडलेड ओव्हल, ॲडलेड
  • तिसरी कसोटी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (14 ते 18 डिसेंबर) द गाबा, ब्रिस्बेन
  • चौथी कसोटी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (26 ते 30 डिसेंबर) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
  • पाचवी कसोटी: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (3 ते 7 जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.