IND vs AUS WC 2023 | KL Rahul ने 97 धावा करुनही त्याचा चेहरा का पडला? VIDEO

IND vs AUS WC 2023 | टीम इंडिया मॅच जिंकली. पण त्यानंतर राहुलच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव दिसले. नंतर तो सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला. पण केएल राहुलने मैदानात असं काय केलं, की त्याला स्वत:वरच विश्वास नाही बसला.

IND vs AUS WC 2023 | KL Rahul ने 97 धावा करुनही त्याचा चेहरा का पडला? VIDEO
IND vs AUS WC 2023 Match KL RahulImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 9:51 AM

चेन्नई : एका अवघड सामन्यात विजयाने टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कप 2023 मधील आपल्या प्रवासाची सुरुवात केलीय. चेन्नईमध्ये टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट राखून विजय मिळवला. टीम इंडियाच्या विजयात अनेक स्टार्सनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यात केएल राहुलचा रोल महत्त्वाचा होता. त्याने नाबाद 97 धावा केल्या. सुरुवातीच्या 3 धक्क्यातून सावरत टीम इंडियाने हा विजय मिळवला. राहुलच्या बॅटमधून टीम इंडियासाठी विनिंग शॉट निघाला. या विजयामुळे टीम इंडियाचे चाहते आणि केएल राहुल आनंदी आहेत. त्याचवेळी राहुलला थोडा त्रासही झाला. त्यामुळे त्याचा चेहरा पडला व तो मैदानातच बसला. चेन्नईमध्ये रविवारी केएल राहुल वर्ल्ड कपमधला पहिला सामना खेळला. त्याच्या महिनाभर आधी तो टीम इंडियाचा भाग सुद्धा नव्हता.

आयपीएलमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे टीम इंडियात त्याच पुनरागमन होणं कठीण वाटत होतं. एका दुखापतीमधून सावरला, तर दुसऱ्या दुखापतीने पुनरागमन लांबवलं. मात्र, तरीही त्याला वर्ल्ड कप टीममध्ये स्थान मिळालं. त्याच्या टीममधील स्थानाबद्दल साशंकता होती. खासकरुन त्याच्या फॉर्मबद्दल. आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध शानदार शतक झळवकून त्याने सर्व टीकाकारांना चोख उत्तर दिलं. आशिया कपमध्ये कमाल केली. त्यानंतर राहुलची परीक्षा एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होती. वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात फक्त 200 धावांच टार्गेट समोर होतं. पण टीम इंडियाने 2 रन्सवर 3 विकेट गमावले होते. तीन फलंदाज खातही उघडू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियन गोलंदाज घातक ठरत होते. मात्र, तरीही राहुल आणि विराट कोहलीने संयम सोडला नाही. 165 धावांची शानदार भागीदारी करुन टीम इंडियाला विजय मिळवून दिला.

राहुलकडे तो चान्स होता

कोहली आपल्या शतकाच्या दिशने कूच करत होता. पण तो 85 रन्सवर आऊट झाला. विजय निश्चित होता. पण इथे केएल राहुलला सेंच्युरी करायची संधी होती. 42 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला विजयासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता होती. राहुल स्ट्राइकवर होता. तो शतकापासून 9 धावा दूर होता. शतकासाठी त्याला एक चौकार आणि सिक्सची गरज होती. राहुल इतक्या चांगल्या फॉर्ममध्ये होता की, त्याने दुसऱ्या चेंडूवर कव्हर्समध्ये शानदार सिक्स मारला.

View this post on Instagram

A post shared by ICC (@icc)

हे त्यालाच समजल नाही

राहुलने हा शॉट मारला, तेव्हा त्याला वाटलं की फोर जाईल. पण टायमिंग इतका सुंदर होता की, चेंडू थेट सिक्ससाठी गेला. प्रत्येक जण टीम इंडियाच्या विजयाच सेलिब्रेशन करत होता. पण राहुलचा चेहरा पडला. तो पीचवरच गुडघ्यावर बसला. हे कसं झालं, हे त्यालाच समजल नाही. त्याच्या हातून शतकाची संधी निसटली. विजय पक्का झाल्यानंतर शतकासाठी प्रयत्न करत होतो, हे राहुलने सुद्धा मान्य केलं. पण शॉट इतका शानदार होता की, शतक पूर्ण होऊ शकलं नाही. टुर्नामेंटमध्ये पुढे शतक झळकवीन असा विश्वास केएल राहुलने व्यक्त केला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.