IND vs SA | टीम इंडिया जिंकली पण दक्षिण आफ्रिकेच्या ‘या’ प्लेयरला मानलं, एकदम जबरदस्त
IND vs SA | टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना जिंकला. टीम इंडियासाठी हा खूप मोठा विजय आहे. कारण दक्षिण आफ्रिकेच्या आग ओकणाऱ्या पीचवर सामना जिंकलाय. भारताने सामना जिंकला. पण दक्षिण आफ्रिकेच्या टीममधील एका प्लेयरने मन जिंकलं. खरोखरच त्याला मानाव लागेल.
IND vs SA | टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेतील दुसरा कसोटी सामना अवघ्या दोन दिवसात संपला. टीम इंडियाने दुसऱ्या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पहिला कसोटी सामना गमावल्यामुळे टीम इंडियाच मालिका विजयाच स्वप्न अपूर्ण राहिलं. पण सीरीज 1-1 अशी बरोबरीत सोडवली. केपटाऊन टेस्ट आणखी एका कारणामुळे गाजली ते म्हणजे पीच. केपटाऊनच्या विकेटवर पहिल्याच दिवशी 23 विकेट गेले. दुसऱ्यादिवशी सामनाच निकाली निघाला. त्यामुळे केपटाऊनच्या विकेटवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. केपटाऊनच्या विकेटवर 100 धावा करण सुद्धा कठीण होतं, एक-एक धाव घेण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. त्याच 22 पावलाच्या विकेटवर दक्षिण आफ्रिकेचा ओपनर एडेन मार्करमने इतिहास रचला.
मार्करमने केपटाऊन टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शानदार सेंच्युरी झळकवली. ज्या पीचवर एकही फलंदाज अर्धशतक झळकवू शकला नाही, तिथे मार्करमने 99 चेंडूत शतक झळकावलं. मार्करमने टेस्ट करिअरमध्ये 7 व्यां दा अशी कामिरी केली. या शतकानंतर तो लगेच बाद झाला. मार्करमने 106 धावा केल्या. पूर्ण वनडे स्टाइलमध्ये त्याने बॅटिंग केली. 103 चेंडूत 106 रन्स करताना त्याने 17 फोर आणि 2 सिक्स मारले. मार्करमचा महत्त्वाचा विकेट मोहम्मद सिराजने काढला. आपल्या शतकी खेळीने त्याने दक्षिण आफ्रिकेला 64 धावांची आघाडी मिळवून दिली होती.
100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा
एडेन मार्करमच शतक यासाठी खास आहे कारण न्यूलँडसच्या पीचवर पहिल्यादिवशी 23 विकेट गेले होते. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या 55 धावांवर आटोपला होता. दुसऱ्याडावातही दक्षिण आफ्रिकेची स्थिती चांगली नव्हती. पहिल्यादिवशी दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी 3 विकेट गमावले होते. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्यादिवशी 4 विकेट लवकर गमावले. पण तरीही मार्करम खेळपट्टिवर टिकून राहिला. न्यूलँडसच्या पीचवर वेगवान गोलंदाज आग ओकणारी गोलंदाजी करत होते. त्याने अशा कठीण विकेटवर शतक झळकवलं. मार्करमन या पीचवर 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा केल्या. ही मोठी बाब आहे.
Virat Kohli congratulated Aiden Markram on scoring an exceptional century. pic.twitter.com/2Kme5ITNwp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 4, 2024
विराटला प्रभावित करण सोपं नाही
मार्करमने शतक झळकवल्यानंतर स्वत: विराट कोहलीने त्याच कौतुक केलं. विराटला स्वत:ला माहित होतं की, या पीचवर धावा बनवण किती कठीण आहे. मार्करमन शतक ठोकून विराटला प्रभावित केलं.