IND vs AUS WC 2023 | विश्वास नाही बसणार, टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियन्स खेळले तब्बल इतके डॉट बॉल

IND vs AUS WC 2023 | काय सांगता? टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियन टीमला इतक्या चेंडूंवर एकही धाव घेता आली नाही. सर्वाधिक वेळा वनडे वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमची भारचीय स्पिनर्ससमोर अशी अवस्था. टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कपमध्ये विजयी सुरुवात केली आहे.

IND vs AUS WC 2023 | विश्वास नाही बसणार, टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलियन्स खेळले तब्बल इतके डॉट बॉल
IND vs AUS WC 2023Image Credit source: AFP
Follow us
| Updated on: Oct 09, 2023 | 9:07 AM

चेन्नई : वनडे वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम भारतासमोर मोठं आव्हान निर्माण करेल अशी अपेक्षा होती. पण त्यांचे फलंदाज असं करु शकले नाहीत. पॅट कमिन्सने फलंदाजांवर विश्वास ठेवला. टॉस जिंकून त्याने पहिली फलंदाजी स्वीकारली. पण ऑस्ट्रेलियन टीमचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. ऑस्ट्रेलियन टीम भारतीय स्पिनर्ससमोर फक्त 199 धावा करु शकली. रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन आणि कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना टिकूच दिलं नाही. सततच्या विकेटमुळे ऑस्ट्रेलियन टीमच कंबरड मोडलं. ऑस्ट्रेलियन टीमकडून कोणाची बॅट चालली, तर स्टीव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर. हे दोघे टीम इंडिया विरुद्ध अर्धशतक झळकवू शकले नाहीत. पण हे दोघे मैदानावर होते, तेव्हा भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवून ठेवली होती. स्टीव्ह स्मिथने 71 चेंडूत पाच फोरच्या मदतीने 46 धावा केल्या. तेच डेविड वॉर्नरने 52 चेंडूत सहा फोरच्या मदतीने 41 धावा केल्या.

संध्याकाळच्यावेळी दव पडतो, अशावेळी फलंदाजी करणाऱ्या टीमचा फायदा असतो. पण पॅट कमिन्सने टॉस जिंकून फलंदाजी का घेतली? हा प्रश्न अनेकांना पडलाय. ऑस्ट्रेलियन टीमने खराब सुरुवात केली. तिसऱ्याच ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने (2/35) मिचेल मार्शला आऊट केलं. भारताच्या वेगवान गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. मात्र, डेविड वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथने 69 धावांची भागीदारी केली. वॉर्नरला (41) कुलदीपने आपल्या चेंडूवर कॅच घेऊन पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ (46) आणि मार्नस लाबुशेन चांगली भागीदारी करताना दिसत होते. पण रवींद्र जाडेजाने आपली जादू दाखवली. रवींद्र जाडेजा आयपीएलमधील आपल्या होम ग्राऊंडवर खेळत होता. त्या अनुभवाचा त्याने फायदा उचलला. जाडेजाने एका सुंदर चेंडूवर स्मिथला आऊट केलं. इथूनच भारतीय स्पिनर्सनी मॅचवर वर्चस्व गाजवलं. विश्वास नाही बसणार, पण असं घडलं

पुढच्याच ओव्हरमध्ये जाडेजाने लाबुशेन आणि एलेक्स कॅरीची विकेट काढली. पाहता, पाहता ऑस्ट्रेलियाने 140 रन्सवर 7 विकेट गमावले. मिचेल स्टार्क (28) आणि पॅट कमिन्स (15) यांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने आणखी 59 धावांची भर घातली व टीमचा स्कोर 199 पर्यंत पोहोचवला. टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला असं काही जखडून टाकलं की, त्यांना धावा करायची संधीच दिली नाही. या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाला अजिबात सहजतेने धावा करता आल्या नाहीत. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी त्यांच्या चांगलेच नाकीनाऊ आणले. विश्वास नाही बसणार, पण क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा वनडे वर्ल्ड कप उंचावणाऱ्या ऑस्ट्रेलियन टीमने या मॅचमध्ये तब्बल 175 डॉट बॉल खेळले. म्हणजे निर्धाव चेंडू, ज्यावर एकही धाव निघाली नाही.

Non Stop LIVE Update
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर....
असं काय झालं? राज-शिंदेंमध्ये फाटलं, पक्ष-चिन्ह ढापण्याच्या टीकेवर.....
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?
महाराष्ट्राचे CM एकनाथ शिंदेच असणार की...? काय म्हणाले मुख्यमंत्री?.
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्
शिंदेंच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचलं, बाळासाहेबांचा फोटो अन्.
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार
आपल्या सभेत त्यांच्यासाठी..,मनसेच्या सभेतील खूर्ची अन् राऊतांचा पलटवार.
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.