Yashashvi Jaiswal Century | रेकॉर्ड इनिंगनंतर यशस्वी जैस्वाल भावूक झाला, म्हणाला ‘ही तर….’
Yashashvi Jaiswal Century | डेब्यु टेस्ट मॅचमध्ये यशस्वी जैस्वालने शतकी खेळी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर यशस्वीने आपण या इनिंगमुळे खूप भावूक झाल्याच सांगितलं. यशस्वी अजूनही नाबाद आहे.
रोसेऊ : डेब्यु करणाऱ्या प्रत्येक खेळाडूच सगळ्यांना लक्षात राहील अशी छाप उटमवण्याच स्वप्न असतं. भारताचा युवा फलंदाज जैस्वाल यात यशस्वी ठरला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध डॉमिनिकाच्या विंडसर पार्कवर यशस्वी जैस्वालला डेब्युची संधी मिळाली. त्याने मिळालेल्या संधीच सोनं केलं. त्याने आपल्या पदार्पणाच्या कसोटीतच शतक ठोकलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना यशस्वी 143 धावांवर नाबाद आहे. पदार्पणातच अशी इनिंग खेळल्यानंतर यशस्वी भावूक झाला.
या टेस्टमध्ये वेस्ट इंडिजने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. यजमान टीमचे फलंदाज काही खास करु शकले नाहीत. वेस्ट इंडिजची टीम 150 रन्सवर ऑलआऊट झाली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपताना टीम इंडियाने 2 बाद 312 धावा केल्या होत्या.
यशस्वी जैस्वाल सेंच्युरीनंतर काय म्हणाला?
दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर यशस्वीने आपण या इनिंगमुळे खूप भावूक झाल्याच सांगितलं. “मैदानात मी मोकळेपणाने खेळण्यासाठी गेलो होतो, त्यात यशस्वी ठरलो. शतक झळकवण हा भावनिक क्षण असून त्याचा अभिमान आहे” असं यशस्वीने सांगितलं. ‘ही तर सुरुवात आहे पुढे जाण्यासाठी सर्वकाही करेन’ अस तो म्हणाला. टीम इंडियात संधी मिळणं खूप कठीण आहे. इथवरच्या प्रवासासाठी यशस्वीने कॅप्टन रोहित शर्मा, भारतीय टीम मॅनेजमेंट आणि पाठिराख्यांचे आभार मानले.
पीचबद्दल यशस्वी काय म्हणाला?
“या पीचवर बॅटिंग करण सोपं नव्हतं. कारण खेळपट्टी खूप धीमी होती. वातावरणात उकाडा आणि आऊटफिल्ड सुद्धा स्लो होतं” असं यशस्वीने सांगितलं. देशासाठी चांगलं खेळण्याच त्याच स्वप्न आहे. टेस्ट क्रिकेट आपल्याला विशेष आवडतं. या फॉर्मेटमध्ये आव्हानांचा सामना करायला आवडतो, असं त्याने सांगितलं.
Apni ballebaazi ? se inhone ne kara #Windies ko behaal ?
Padhare debut pe shatakveer Yashasvi Jaiswal ?#WIvIND #SabJawaabMilenge #JioCinema pic.twitter.com/rIn6nAF6ub
— JioCinema (@JioCinema) July 13, 2023
यशस्वीने काय रेकॉर्ड केले?
यशस्वीने त्याच्या इनिंगमध्ये अनेक रेकॉर्ड बनवले. भारताबाहेर कुठल्याही भारतीय फलंदाजाने डेब्यु टेस्टमध्ये केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. या बाबतीत त्याने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला मागे टाकलं. 1996 साली लॉर्ड्सवर सौरव गांगुलीने 133 धावा केल्या होत्या. डेब्यु मॅचमध्ये शतक झळकवणारा यशस्वी भारताचा तिसरा ओपनर आहे. त्याच्याआधी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ ने अशी कामगिरी केलीय. रोहितने यशस्वीसोबत पहिल्या विकेटसाठी 229 धावांची भागीदारी केली. आशिया खंडाच्या बाहेर भारताच्या ओपनिंग जोडीने केलेली ही सर्वात मोठी पार्ट्नरशिप आहे.