भारतीय गोलंदाजाची निराशाजनक कामगिरी कायम, झिम्बाब्वे, बांग्लादेश पेक्षाही खराब गोलंदाजीचे आकडे

भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात गोलंदाजानी सुरुवातीच्या ओव्हरमध्ये निराशाजनक कामगिरी कायम ठेवली.

भारतीय गोलंदाजाची निराशाजनक कामगिरी कायम, झिम्बाब्वे, बांग्लादेश पेक्षाही खराब गोलंदाजीचे आकडे
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यातील एक क्षण
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 6:50 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) हा क्रिकेट जगतातील एक टॉपचा संघ आहे. वन-डे, कसोटी आणि टी-20 सर्व प्रकारांत भारतीय संघ अप्रतिम कामगिरी करत आहे. फलंदाजी, गोलंदाजीसह अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाला मागील काही वर्षे एक गोष्ट मात्र सतावत आहे. ती म्हणजे गोलंदाजाची सुरुवातीच्या ओव्हरमध्ये (पावरप्लेमध्ये) निराशाजनक कामगिरी. मागील बऱ्याच काळापासून भारतीय गोलंदाजाना सुरुवातीच्या ओव्हरमध्ये विकेट घ्यायला जमत नाही. ज्यामुळे प्रतिस्पर्धी संघ एक मोठी भागिदारी रचण्यात यशस्वी होतो आहे.

श्रीलंकेत सुरु असलेल्या 3 दिवसांच्या मालिकेतही पहिल्या दोन्ही सामन्यात हेच पाहायला मिळालं. ज्यात पहिल्या सामन्यात एकही विकेट न गमावत 49 आणि दुसऱ्या वनडेमध्ये 77 धावांची भागिदारी श्रीलंका संघाच्या सलामीवीरांनी रचली. ज्यामुळे वनडे क्रिकेटमध्ये सुरुवातीच्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करताना भारतीय संघाची सरासरी आणि स्ट्राइक रेट अत्यंत खराब असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. पहिल्या 10 ओव्हरमध्ये विकेट घेण्यात भारत झिम्बाब्वे, बांग्लादेश आणि अफगानिस्तान यासारख्या संघापेक्षाही मागे आहे. 2019 क्रिकेट वर्ल्ड कपनंतर भारताने आतापर्यंत 20 वनडे सामने खेळले असून त्यात पहिल्या 10 ओव्हरमध्ये केवळ 9 विकेट्सच घेतले आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांची सरासरी पाहता पावरप्लेच्या 10 ओव्हरमध्ये कमीत कमी 132 धावा दिल्यानंतर आणि 120 चेंडू फेकल्यानंतर त्यांना पहिली विकेट मिळाली आहे.

मागील 18 पैकी सात सामन्यात शतकीय भागिदारी

भारतीय संघाने खेळलेल्या मागील 18 वन-डे सामन्यांमध्ये विरोधी संघाने सात वेळा पहिल्या विकेट्ससाटी शतकीय भागिदारी केली आहे. तर पाच सामन्यात अर्धशतकीय ओपनिंग भागिदारी केली आहे. तर पाच वेळेस भारतीय गोलंदाजानी 25 धावा होण्यापूर्वी समोरच्या फलंदाजी भागीदारी तोडली आहे. भारतीय संघाविरोधात मागील 18 वनडेमधील ओपनिंग भागिदारी- 14, 110, 135, 25, 142, 156, 106, 93, 85, 18, 20, 258*, 57, 61, 11, 115, 49, 77.

हे ही वाचा

IND vs SL : सहा वर्षात पहिल्यांदाच नो बॉल, भारताच्या हुकमी गोलंदाजाची छोटी चूक, मोठा विक्रम तुटला

IND vs SL : युझवेंद्र चहलसाठी आजचा सामना महत्त्वाचा, एका ‘षटकाराने’ करु शकतो शमीच्या विक्रमाशी बरोबरी

विराटला निवृत्तीनंतर मिळणारी ‘ही’ गोष्ट आताच मिळाली, कोहलीबाबत युवराज सिंगने केलं मोठ वक्तव्य

(Team Indias Powerplay bowling average and Strike Rate Worst in ODIs after 2019 world cup)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.