वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी BCCI या आठवड्यात टीम इंडियाची घोषणा कणार, दिग्गज खेळाडू पुनरागमनासाठी सज्ज
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेला 6 फेब्रवारीपासून सुरुवात होत आहे. यासाठी 1 फेब्रुवारीला वेस्ट इंडिजचा संघ अहमदाबादला पोहचत आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील पराभव विसरुन टीम इंडियाला घरच्या खेळपट्टीवर चांगला खेळ करावा लागणार आहे.
मुंबई : नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यात भारताचा दारुण पराभव झाला आहे. यजमान संघाने आपल्या घरच्या खेळपट्टीवर चांगला खेळ करत भारताला पराभूत केले. परंतु आता वेस्ट इंडिजच्या (West Indies) संघाविरुध्द चांगला खेळ करण्याचे आव्हान टीम इंडियासमोर (Team India) असणार आहे. शिवाय घरची खेळपट्टी असल्याने भारतीयांच्या अपेक्षाही उंचावणार आहे. वेस्ट इंडिजविरुध्दच्या पुढील मालिकेवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी टीम इंडियात काही बदल अपेक्षित आहे. वेस्ट इंडिज संघाला भारत दौऱ्यावर 3 एकदिवसीय (ODI) आणि 3 टी- 20 (T20) सामन्यांची मालिका खेळायची आहे. हा दौरा 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, या आठवड्यात टीम इंडियाची घोषणा होऊ शकते. ‘स्पोर्ट्स टायगर’ला मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाची दक्षिण आफ्रिकेतील कामगिरी पाहता वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी संघात काही बदल होण्याची शक्यता आहे.
हॅमस्ट्रिंग इंज्युरीमुळे दक्षिण आफ्रिकेला न गेलेल्या कर्णधार रोहित शर्माचे पुनरागमन हा सर्वात मोठा बदल असू शकतो. याशिवाय रवींद्र जाडेजाही संघात पुनरागमन करेल. या दोन खेळाडूंच्या पुनरागमनाशिवाय संघाच्या गोलंदाजीतही मोठे बदल पाहायला मिळू शकतात.
2 मैदानांवर मालिकेचे आयोजन
कोरोनामुळे अनेक ठिकाणी सामने आयोजित करण्याऐवजी बीसीसीआयने आता 6 ऐवजी फक्त 2 ठिकाणी हे सामने आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर टी-20 सामने होणार आहेत. भारत दौऱ्यावर असलेला कॅरेबियन संघ 1 फेब्रुवारीला अहमदाबादला पोहोचेल.
NEWS ? : BCCI announces revised venues for home series against West Indies.
The three ODIs will now be played at the Narendra Modi Stadium, Ahmedabad and three T20Is will be held at the Eden Gardens, Kolkata.
More details here – https://t.co/vH9SOhtpIS #INDvWI pic.twitter.com/KNEZ8swbVa
— BCCI (@BCCI) January 22, 2022
वेस्ट इंडिजचे वेळापत्रक
भारत दौऱ्यावर वेस्ट इंडिजला आधी वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना 6 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. यानंतर उर्वरित 2 सामने 9 फेब्रुवारी आणि 11 फेब्रुवारीला होतील. 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर टी-20 मालिका सुरू होईल. पहिला सामना 16 फेब्रुवारीला, दुसरा सामना 18 फेब्रुवारीला तर तिसरा सामना 20 फेब्रुवारीला खेळवला जाईल.
इतर बातम्या
ICC Women’s Cricketer 2021: विराट-रोहितला जमलं नाही ते सांगलीच्या स्मृती मानधनाने करुन दाखवलं