Ind Vs Sa 2nd T20 | ‘हे’ जिंकवणार T20 वर्ल्ड कप? दोन बॉलर टीम इंडियाचे विलन, आफ्रिकेसमोर सरेंडर
Ind Vs Sa 2nd T20 | T20 सीरीजमध्ये टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहे. पहिल्या सामन्यावर पावसाने पाणी फिरवल होतं. दुसऱ्या सामन्यात आफ्रिकन टीमने धावांचा पाऊस पाडला. भारतीय टीम पूर्णपणे सरेंडर मोडमध्ये दिसली.
Ind Vs Sa 2nd T20 | भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये मंगळवारी सीरीजमधला दुसरा T20 सामना झाला. पहिल्या सामन्याप्रमाणे या मॅचमध्येही पावसाने खेळ बाधित केला. टीम इंडियाच्या पराभवासाठी हा पाऊस एक मोठ कारण आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकला. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. पाऊस आल्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर नवीन लक्ष्य ठेवण्यात आलं. याचाच फायदा मायदेशात खेळणाऱ्या आफ्रिकेने उचलला. मॅचचा रिझल्ट सगळ्यांसमोर आहे.
टीम इंडियासाठी या मॅचमध्ये बॉलर्सनी खराब प्रदर्शन केलं. टीम इंडिया या मॅचमध्ये टक्कर देतेय, असं कुठेही वाटलं नाही. आधी मोहम्मद सिराजने खराब सुरुवात दिली. त्यानंतर अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर खोऱ्याने धावा निघाल्या. टीम इंडियाला मॅचमध्ये पुनरागमनाची कुठलीही संधी दिसली नाही. टीम इंडियाने पहिली बॅटिंग करताना 180 धावा केल्या.
इथेच कदाचित टीम इंडियाचा पराभव निश्चित झालेला
टीम इंडियाकडून रिंकू सिंह सुपरस्टार ठरला. त्याने 39 चेंडूत 68 धावा फटकावल्या. यात 9 फोर आणि 2 सिक्स होते. रिंकू सिंहशिवाय कॅप्टन सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 56 धावांची धमाकेदार इनिंग खेळली. याच इनिगच्या बळावर टीम इंडिया 180 धावसंख्येपर्यंत पोहोचली. भारताच्या डावातील शेवटची ओव्हर सुरु असताना पाऊस आला. सामना थांबवावा लागला. इथेच कदाचित टीम इंडियाचा पराभव निश्चित झाला होता. कारण त्यानंतर टार्गेट बदलण्यात आलं.
कुठल्या ओव्हरमध्ये आफ्रिकेला विजयाची लय सापडली?
दक्षिण आफ्रिकेसमोर पावसामुळे 15 ओव्हर्समध्ये 152 धावांच टार्गेट ठेवण्यात आलं. वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेने ज्या पद्धतीने फलंदाजी केलेली ते पाहता हे लक्ष्य त्यांच्यासाठी सोप वाटत होतं. अगदी पहिल्या ओव्हरपासून आफ्रिकन फलंदाजांनी आपले इरादे स्पष्ट केले. मोहम्मद सिराजने पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा दिल्या. त्यानंतर आफ्रिकेच्या टीमला मोमेंटम म्हणजे विजयाची लय सापडली.
हेच दोघे टीम इंडियाचे मुख्य गोलंदाज होते
दक्षिण आफ्रिकेच्या टीमने पावरप्लेच्या 6 ओव्हर्समध्ये 78 धावा केल्या. त्यांचा विजय निश्चित दिसत होता. दक्षिण आफ्रिकेकडून रीज़ा हेंड्रिक्सने 49, एडन मर्करमने 30 धावा केल्या. अखेरीस डेविड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्सने छोट्या-छोट्या इनिंग खेळून टीमला विजय मिळवून दिला. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने 3 ओव्हर्समध्ये 27 आणि अर्शदीप सिंहने फक्त 2 ओव्हर्समध्ये 31 धावा दिल्या. हेच दोघे टीम इंडियाचे मुख्य गोलंदाज होते.