गेमिंग प्रोसेसर, 5000mAh ची बॅटरी, 9 हजारांच्या रेंजमध्ये शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या सर्वकाही

Tecno ने भारतीय मोबाईल बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्याचे नाव Tecno Spark 8 आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे.

गेमिंग प्रोसेसर, 5000mAh ची बॅटरी, 9 हजारांच्या रेंजमध्ये शानदार स्मार्टफोन लाँच, जाणून घ्या सर्वकाही
Tecno Spark 8
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 5:55 PM

मुंबई : Tecno ने भारतीय मोबाईल बाजारात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्याचे नाव Tecno Spark 8 आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे, ज्यामध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. कंपनीने हा फोन सप्टेंबरमध्ये लॉन्च केला होता, परंतु नवीन व्हेरिएंटमध्ये जुन्या व्हर्जनच्या तुलनेत नवीन प्रोसेसर आणि वेगळे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. (Tecno Spark 8 new model launched with MediaTek Helio G25 processor and 3GB RAM)

Tecno Spark 8 ची किंमत

Tecno Spark 8 च्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची किंमत 9,299 रुपये आहे, ज्यामध्ये 3 GB रॅम आणि 32 GB इंटर्नल स्टोरेज उपलब्ध आहे. तसेच हा फोन किरकोळ दुकानातून विकत घेता येईल. हा स्मार्टफोन Atlantic Blue, Iris Purple आणि Turquoise Cyan कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. तर Tecno Spark 8 चे 2 GB रॅम आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंट भारतात 7,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

Tecno Spark 8 चे स्पेसिफिकेशन्स

Tecno Spark 8 ड्युअल सिम सपोर्टसह येतो आणि तो Android 11 आधारित HiOS v7.6 वर काम करतो. तसेच, या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंच एचडी प्लस डॉट नॉच डिस्प्ले आहे. तसेच यामध्ये 480 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे.

या Tecno स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G25 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे, तर MediaTek Helio A25 चिपसेट वेरिएंटमध्ये 2 GB रॅमसह वापरण्यात आला आहे. Tecno च्या लेटेस्ट फोनमध्ये 3GB LPDDR4x रॅम आहे. यामध्ये गेमिंगसाठी हायपर इंजिन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचा टेक्नोचा दावा आहे.

Tecno Spark 8 चा कॅमेरा सेटअप

Tecno Spark 8 च्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, याच्या बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, जो LED फ्लॅश लाईट्ससह येतो. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 16 मेगापिक्सल्सचा आहे, जो f/1.8 लेन्ससह येतो. यात AI लेन्स देखील आहे, जी f/2.0 अपर्चर सह येतो. बॅक पॅनलवरील कॅमेरामध्ये AI ब्युटी, स्माइल शूट, AI पोर्ट्रेट, HDR, AR शूट, फिल्टर्स, टाइम लॅप्स आणि स्लो मोशन सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनमध्ये फ्रंटला 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरला जातो. फ्रंट कॅमेरा ड्युअल एलईडी फ्लॅशलाइटसह येतो.

Tecno Spark 8 ची बॅटरी आणि इतर फीचर्स

Tecno Spark 8 मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, यात 32GB of eMMC 5.1 ऑनब्रोड आहे आणि युजर्स आवश्यक असल्यास 256GB पर्यंत microSD कार्ड जोडू शकतात, ज्यासाठी स्वतंत्र स्लॉट दिला आहे. यामधील कनेक्टिव्हिटी पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर यात 4G LTE, WiFi, Bluetooth v5.0, GPS, Micro USB आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. सुरक्षेच्या दृष्टीने, याच्या मागील पॅनलवर फिंगरप्रिंट स्कॅनर आहे, जो बायोमेट्रिक पद्धतीने फोन अनलॉक करण्याचे काम करतो.

इतर बातम्या

48MP कॅमेरा आणि दमदार फीचर्स, नोकियाचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लाँच, किंमत…

50MP कॅमेरा आणि आकर्षक डिझाईनसह Poco M4 Pro 5G स्मार्टफोन बाजारात, जाणून नव्या स्मार्टफोनमध्ये काय आहे खास

64MP क्वाड कॅमेरा, मीडियाटेक प्रोसेसर, स्टाँग बॅटरीसह Lava चा पहिला 5G फोन बाजारात, कंपनीकडून 2000 रुपयांचा डिस्काऊंट

(Tecno Spark 8 new model launched with MediaTek Helio G25 processor and 3GB RAM)

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.