हैदराबादचा ‘हा’ फलंदाज सानिया मिर्झाचा काका, भारत सोडून पाकिस्तानला गेला, 9 व्या क्रमांकावर शतक झळकावलं!
उजव्या हाताचा फलंदाज आणि उजवा हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज आसिफ इक्बाल आज त्यांचा वाढदिवस... आपण नजर टाकूया आसिफ इक्बाल यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर...! (Tennis Star Sania Mirza Relation With Pakistani Player Asif Iqbal)
मुंबई : आज 6 जून… आजच्याच दिवशी हैदराबादमध्ये एका क्रिकेटपटूचा जन्म झाला. तो भारतातही देशांतर्गत क्रिकेट खेळला, पण त्यानंतर तो भारत सोडून पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी गेला. ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये नऊ क्रमांकावर उतरुन ऐतिहासिक शतक ठोकले. शिवाय हा क्रिकेटपटू भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार गुलाम मोहम्मद आणि भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाशीही संबंधित आहे. उजव्या हाताचा फलंदाज आणि उजवा हाताचा मध्यम वेगवान गोलंदाज आसिफ इक्बाल असं या खेळाडूचे नाव आहे. आज त्यांचा वाढदिवस… आपण नजर टाकूया आसिफ इक्बाल यांच्या क्रिकेट कारकिर्दीवर…! (Tennis Star Sania Mirza Relation With Pakistani Player Asif Iqbal)
आसिफ हैदराबाद, कराची, केंट, नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान आणि पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सकडून क्रिकेट खेळले. हैदराबादमध्ये क्रिकेट शिकल्यानंतर ते 1961 मध्ये पाकिस्तानात स्थायिक झाले. तिथे त्याने गोलंदाजी सुरु केली. 1977 मध्ये आसिफ यांनी वर्ल्ड इलेव्हनच्या वर्ल्ड सिरीज क्रिकेटमध्ये भाग घेतला होता. आसिफ यांनी 1964-65 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कराची कसोटी सामन्यात पदार्पण केलं.
पाठीच्या सततच्या दुखण्यामुळे त्यांनी गोलंदाजीऐवजी फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली आणि पाकिस्तान संघात त्यांच्या फलंदाजीचा क्रम वरचेवर टॉप ऑर्डरच्या दिशेने सरकू लागला. 1967 च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 9 व्या क्रमांकावर बॅटिंगला येत त्यांनी पहिलं कसोटी शतक झळकावलं. आसिफ यांनी या ऐतिहासिक खेळीत 146 धावा केल्या. हा सामना ओव्हल येथे खेळला गेला.
आसिफ सानियाचे काका
आसिफ इक्बाल हे भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचे काका आहेत. भारतीय संघाचे माजी कर्णधार गुलाम अहमद यांची सासू आणि सानिया मिर्झाच्या वडिलांची आई दोघीही बहिणी होत्या. आसिफ इक्बाल गुलाम अहमद यांचे भाचे आहेत.
440 मॅचमध्ये 45 शतकं, 23 हजार रन्स
आसिफ इक्बालने आपल्या कारकिर्दीत एकूण 58 कसोटी सामने खेळले, ज्यात त्यांनी 38.85 च्या सरासरीने 3575 धावा केल्या. यात 11 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश होता. कसोटी क्रिकेटमधील त्यांची सर्वाधिक धावसंख्या 175 धावा होती. त्याचबरोबर 10 एकदिवसीय सामन्यात त्यांनी 55 च्या सरासरीने 330 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्यांच्या नावावर 5 अर्धशतके आहेत. आसिफ यांनी 440 प्रथम श्रेणी सामन्यात 23329 धावा केल्या. यात त्यांनी 45 शतकंही ठोकली. यामध्ये 196 धावा ही त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. लिस्ट ए सामन्यांमध्ये आसिफ यांनी 27.98 च्या सरासरीने 5989 धावा केल्या. यामध्ये 3 शतके आणि 33 अर्धशतके आहेत.
(Tennis Star Sania Mirza Relation With Pakistani Player Asif Iqbal)
हे ही वाचा :
सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लाराबद्दल ब्रेट लीचं आश्चर्यचकित करणारं मत, म्हणाला, ‘मला माहिती असायचं…’
WTC फायनलपूर्वी अजित आगरकरचा महत्त्वाचा सल्ला, पण विराट कोहलीला हा सल्ला अजिबात आवडणार नाही!
कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या सात वर्षानंतरही इंग्लंडमधील धोनीचा रेकॉर्ड जसाच्या तसा!