Thane : विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांसाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम सज्ज, 5 सामने खेळवले जाणार

यंदा विजय हजारे ट्रॉफीच्या पाच मॅच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणार आहेत. 6 आणि 7 डिसेंबर रोजी या स्पर्धेतील सहभागी संघांचे सराव सत्र दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणार असून 8, 9, 11, 12 आणि 14 डिसेंबर 2021 रोजी प्रत्यक्ष सामने होणार आहेत.

Thane  : विजय हजारे ट्रॉफीच्या सामन्यांसाठी दादोजी कोंडदेव स्टेडियम सज्ज, 5 सामने खेळवले जाणार
Follow us
| Updated on: Dec 04, 2021 | 6:31 PM

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर यंदा पाहिल्यांदाच होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीच्या रणजी सामनासाठी अत्यावश्यक असणारी डागडुजीची सर्व कामे पूर्ण झाली असून संपूर्ण स्टेडियम क्रिकेटच्या सामन्यासाठी सज्ज आहे. क्रिकेटची भारतात किती क्रेझ आहे हे ओळखूनच हे स्टेडियम सज्ज करण्यात आलं आहे. ठाण्यातील क्रिकेट चाहत्यांना दूर जायला लागू नये, ठाण्यातच क्रिकेट पाहण्याचा लाभ घेता यावा यासाठी पालिकेकडून हे पाऊल टाकण्यात आलं आहे.

पाच मॅच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर

यंदा विजय हजारे ट्रॉफीच्या पाच मॅच ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणार आहेत. 6 आणि 7 डिसेंबर रोजी या स्पर्धेतील सहभागी संघांचे सराव सत्र दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे होणार असून 8, 9, 11, 12 आणि 14 डिसेंबर 2021 रोजी प्रत्यक्ष सामने होणार आहेत. ठाणे महापालिके महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या सूचनेनुसार क्रिडा अधिकारी मिनल पालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिडा विभागाकडून दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये खेळपट्टी, सीमारेषा, प्रेक्षागृह तसेच इतर आवश्यक ती सर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

यंदा पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफिच्या सामन्यांचं आयोजन

ठाणे महानगरपालिकेच्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर यंदा पाहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफीच्या रणजी सामने होणार असल्याने प्रशासनाच्यावतीने विशेष तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्यातील क्रिकेट चाहत्यांसाठी ही मोठी गूडन्यूज आहे. प्रत्यक्ष स्टेडियमवर जाऊन सामन्याचा आनंद घेण्याची मजाच वेगळी असते आणि आता ती ठाण्यातील क्रिकेट चाहत्यांना घेता येणार आहे. तर ठाण्यातील अनेक युवा खेळाडुंसाठीही हे मोठे पाऊल आहे.

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचं दीर्घ आजारानंतर निधन

सुरक्षारक्षकच निघाला ‘चिल्लर चोर,’ मंदिरातून तब्बल 3 हजार रुपये लांबवले

Sara tendulkar : सचिनची मुलगी सारा तेंडुलकरच्या स्पेशल डेटची सोशल मीडियावर चर्चा

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.