शेवटपर्यंत AndrewSymonds ची साथ न सोडणारे ते कुत्रे कुठल्या जातीचे होते? जाणून घ्या श्वानाच्या त्या जोडीबद्दल

एक कुत्रा तर खूप संवेदनशील होता. तो सायमंड्सला सोडून जायला तयार नव्हता. सायमंड्सला अखेरपर्यंत शेवट करणारा हा कुत्रा कोण होता? कुठल्या प्रजातीचा होता? त्या बद्दल जाणून घेऊया.

शेवटपर्यंत AndrewSymonds ची साथ न सोडणारे ते कुत्रे कुठल्या जातीचे होते? जाणून घ्या श्वानाच्या त्या जोडीबद्दल
Andrew symonds with his dogImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 3:11 PM

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचं (Andrew Symonds Death) मागच्या आठवड्यात रस्ते अपघातात निधन झालं. क्वीन्सलँडमधील एलिस रिव्हर ब्रिजजवळच्या हरवे रेंज रोडवर अँड्र्यू सायमंड्सच्या गाडीचा अपघात (Car Accident) झाला. सायमंड्सची कार रस्ता सोडून पलटी झाली. अपघातानंतर तिथल्या स्थानिकांनी सायमंड्सचा जीव वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण त्यांना यश आलं नाही. सायमंड्सच्या कारचा अपघात झाला, त्यावेळी त्याच्यासोबत दोन कुत्री (Blue Heeler dogs) सुद्धा गाडीमध्ये होती. सायमन्डसचा या अपघातात मृत्यू झाला. पण त्याच्या दोन्ही श्वानांचे प्राण वाचले. एक कुत्रा तर खूप संवेदनशील होता. तो सायमंड्सला सोडून जायला तयार नव्हता. सायमंड्सला अखेरपर्यंत शेवट करणारा हा कुत्रा कोण होता? कुठल्या प्रजातीचा होता? त्या बद्दल जाणून घेऊया.

ब्लू हीलर म्हणजे मूळचे ऑस्ट्रेलियन कॅटल डॉग

सायमंड्ससोबत कारमध्ये जी श्वानांची जोडी होती, त्या कुत्र्यांच्या प्रजातीला ब्लू हीलर म्हणतात. सायंमड्सचा या दोन श्वानांवर आणि श्वानांचाही आपल्या मालकावर जीव होता. ब्लू हीलर प्रजातीचे श्वान ऑस्ट्रेलियन कॅटल डॉग म्हणून ओळखले जातात. दोन वेगवेगळ्या प्रजातीचे कुत्रे एकत्र आणून ऑस्ट्रेलियातच या श्वानाची ही नवी प्रजात तयार करण्यात आली. गुरा-ढोराच्या कळपाला चरायला नेण्यासाठी, त्यांना नियंत्रित करण्यासाठी ब्लू हीलर श्वानांचा वापर केला जायचा.

या कुत्र्यांच वैशिष्ट्य काय?

ऑस्ट्रेलियन कॅटल डॉग प्रजातीमध्ये प्रामुख्याने कुत्र्याचे दोन रंग आहेत. तपकिरी आणि काळा. व्हाइट कलरचा पॅचही या कुत्र्यांच्या अंगावर असतो. ते मध्यम आकाराचे कुत्रे आहेत. ऑस्ट्रेलियन कॅटल डॉग ही ऊर्जावान आणि हुशार कुत्र्याची प्रजात आहे. प्रशिक्षणादरम्यान ते खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात. मालका बरोबर त्यांची घट्ट नाळ जोडलेली असते. मालकाची साथ ते शेवटपर्यंत सोडत नाहीत. सायमंड्सच्या अपघाताच्यावेळी हेच दिसून आलं. या कुत्र्यांना पाळणं आणि त्यांना प्रशिक्षित करणं फार कठीण नाहीय.

त्यांचं आयुष्य किती असतं?

बहिरेपणा आणि आंधळेपणाचा आजार या कुत्र्यांमध्ये प्रामुख्याने आढळून येतो. 12 ते 16 वर्ष या कुत्र्यांच आयुष्य आहे. रेड हीलर आणि क्वीन्सलँड हिलर म्हणूनही हे ऑस्ट्रेलियन कॅटल डॉग ओळखले जातात.

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.