बंगाल क्रिकेट असोसिएशनने ही भेट देऊन विराटचा वाढदिवस बनवला आणखी खास

virat kohli Century : विराट कोहलीने आपल्या वनडे करिअरमधील ४९ वे शतक झळकावले. आपल्याच वाढदिवशी त्याने हे शतक पूर्ण केले आणि जगातील सर्वाधिक शतक असणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी केली. विराटकडे सचिनचा हा रेकॉर्ड मोडण्याची संधी देखील आहे.

बंगाल क्रिकेट असोसिएशनने ही भेट देऊन विराटचा वाढदिवस बनवला आणखी खास
virat kohli birthday
Follow us
| Updated on: Nov 06, 2023 | 3:56 PM

Virat Kohli Birthday : विराट कोहलीने वाढदिवशीच 49 वे शतक झळकावत सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डची बरोबरी केली. यासोबतच त्याने 2023 च्या विश्वचषकातील दुसरे शतक ही झळकावले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहली याने ईडन गार्डन्सवर 101 धावांची खेळी केली. त्याच्या वाढदिवशी एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा तो जगातील सातवा फलंदाज ठरला. सामन्यानंतर विराट कोहलीला क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (CAB) वाढदिवसाची खास भेट देखील दिली.

CAB अध्यक्षांनी विराटला दिली भेट

CAB चे अध्यक्ष स्नेहशिष गांगुली यांनी रविवारी भारतीय फलंदाज विराट कोहलीला वाढदिवसानिमित्त सोन्याचा मुलामा दिलेली बॅट भेट म्हणून दिली.

बॅटवर काय लिहिले आहे?

CAB ने एका निवेदनात म्हटले आहे की, कोहलीला दिलेल्या बॅटवर ‘हॅप्पी बर्थडे विराट’ लिहिले होते.’तुम्ही समर्पणाचे प्रतीक आहात आणि वय हा फक्त एक आकडा आहे याचा हा जिवंत पुरावा आहे.’ या सोबतच विराटने खास त्याच्या पुतळ्याचा डार्क चॉकलेट केकच्या वर ब्लू आयसिंगसह एक मोठा केक देखील कापला.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 101 धावा करून विराटने सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी केली. सचिन तेंडुलकरने देखील त्याला यासाठी शुभेच्छा दिल्या. विराट कोहलीने केवळ 277 डावात आपले 49 वे शतक पूर्ण केले. महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या 451व्या एकदिवसीय डावात 49वे शतक झळकावले.

वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच 500 धावा

दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकनंतर 2023 च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा खेळाडू आहे. त्याच्या 543 धावा 108.60 च्या सरासरीने आणि 88.29 च्या स्ट्राईक रेटच्या आहेत. विश्वचषकात 500 हून अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.