Marcus Stoinis च्या लज्जास्पद कृतीला इंग्लिश क्रिकेट बोर्डाने घातलं पाठिशी, पहा VIDEO
पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनच्या गोलंदाजी Action वर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिसने एका वादाला जन्म दिला आहे.
मुंबई: पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद हसनैनच्या गोलंदाजी Action वर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ऑस्ट्रेलियन ऑलराऊंडर मार्कस स्टॉयनिसने एका वादाला जन्म दिला आहे. त्याचवेळी स्टॉयनिस विरोधात काय कारवाई करणार? त्यासाठी इंग्लिश क्रिकेट बोर्डाकडेही सगळ्यांच लक्ष लागलं होतं. स्टॉयनिसवर कुठल्या प्रकारचा प्रतिबंध किंवा दंडात्मक कारवाई होणार नाही.
कारवाई नाही पण अंपायरने समज दिली
‘द हंड्रेड’ स्पर्धेचे आयोजक इंग्लिश बोर्डाने सध्यातरी या विषयात कुठलीही कठोर कारवाई न करण्याचा निर्णय घेतलाय. स्टॉयनिसची कृती स्पर्धेच्या नियमांच उल्लंघन करणारी होती. पण ECB ने नियम उल्लंघनाची कारवाई न करण्याचा निर्णय घेतलाय. मॅच रेफ्री डीन कॉस्कर यांनी स्टॉयनिसच्या कृत्याची दखल घेत त्याला समज दिली आहे.
Out झाल्यानंतर निर्माण केलं प्रश्नचिन्ह
रविवारी 14 ऑगस्टला हा सर्व वाद झाला. ‘द हंड्रेड’ स्पर्धेत सदर्न ब्रेव आणि ओवल इन्विंसिबल या दोन संघांदरम्यान सामना झाला. ब्रेव संघाकडून खेळणाऱ्या स्टॉयनिसला हसनैनने आऊट केलं. युवा पाकिस्तानी गोलंदाजाने आपल्या वेगवान शॉर्ट पीच चेंडूने स्टॉयनिसला अडचणीत आणलं. स्टॉयनिस त्या चेंडूवर व्यवस्थित पुल शॉट खेळू शकला नाही. तो आऊट झाला. त्यानंतर पॅव्हेलियनच्या दिशेने परतताना स्टॉयनिसने आपल्या हाताने गोलंदाजी Action चा इशारा केला. हसनैनची गोलंदाजीची Action नियमांना धरुन नाही, असे त्याने संकेत दिले. स्टॉयनिसची ही कृती अनेकांना पटली नाही. त्यावर बरीच टीका होत आहे. खासकरुन पाकिस्तानातील क्रिकेटपटुंनी स्टॉयनिसला भरपूर सुनावलं आहे.
This is the video of Mohammmad Husnain bowling to Marcus Stoinis and Stoinis signalling that Husnain is chucking. This is disrespectful from him#Stoinis#Husnain#hundred pic.twitter.com/YXmxzF9tj8
— Homunculus (@MrStrangedoc) August 15, 2022
हसनैनने गोलंदाजी Action मध्ये केली सुधारणा
हसनैनची गोलंदाजी Action या आधी सुद्धा वादात सापडलीय. ऑस्ट्रेलिया मध्ये हा वाद झाला होता. या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियातील बीग बॅश लीग मधील अंपायर्सनी हसनैनच्या गोलंदाजी Action ला संशयास्पद ठरवलं होतं. त्यानंतर त्याच्यावर बंदी घालण्यात आली. या स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मोजेस हेनरिक्सने सुद्धा हसनैनच्या गोलंदाजी Action वर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्यानंतर हसनैनची लाहोरच्या एका विद्यापीठात चाचणी करण्यात आली. हसनैन आपल्या गोलंदाजी Action मध्ये सुधारणा केली. त्यानंतर आयसीसी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने गोलंदाजीची Action योग्य ठरवली. त्याला पुन्हा गोलंदाजीची परवानगी दिली.