हार्दिक पांड्या आणि नताशाच्या घटस्फोटाचं कारण आलं समोर? इन्स्टग्राम पोस्ट…
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा यांचा घटस्फोट झाला असल्याचं काही दिवसांपूर्वीच त्यांनी जाहीर केलं आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या अनेक दिवसांपासून येत होत्या पण कारण समजू शकत नव्हतं. अखेर नताशाने इन्स्टाग्राम पोस्टवरुन संकेत दिले आहेत की त्यांचा घटस्फोट नक्की कशामुळे झालाय
भारतीय संघाचा खेळाडू हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक यांच्या काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला आहे. दोघांनी इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. त्याआधी अनेक दिवसांपासून त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु होती. अखेर ती खरी ठरली. दोघांनी वैवाहिक नाते संपुष्टात आल्याची माहिती चाहत्यांना दिली. दोघांमध्ये मतभेद असल्याने दोघांनी घटस्फोट घेतला. पण खरे कारण अजूनही समोर आले नव्हते.
नताशा आता भारत सोडून तिच्या देशात परतली आहे. तिथे ती आपल्या मुलासोबत वेळ घालवत आहे. तिने काही इन्स्टा पोस्ट शेअर केल्या आहेत. मुलगा अगस्त्यासोबत ती रोज वेळ घालवताना दिसत आहे. दरम्यान अभिनेत्री नताशाने लाईक केलेली पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नताशाने लाईक केलेली ही पोस्ट फसवणुकीशी संबंधित आहे.
नताशाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन फसवणूक आणि भावनिक अत्याचाराशी संबंधित एक पोस्ट लाईक केली आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या पोस्टला लाईक केल्यामुळे दोघांमध्ये ही असेच काहीसे घडले असेल अशी शक्यता लोकांकडून वर्तवली जात आहे. नताशाची हार्दिकने फसवणूक केल्याचे काही यूजर्सचे म्हणणे आहे.
नताशाला आवडलेल्या एका रीलमध्ये असे लिहिले होते की, जर मुलगा अद्याप परिपक्व झाला नाही, तर तो त्याच्या प्रेयसीला कधीच खास बनवू शकणार नाही. तो नेहमी इतर मुलींकडे आकर्षित होईल, परंतु याचा अर्थ असा नाही की तुमच्यामध्ये काही चूक आहे.
हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी 2020 मध्ये विवाह केला होता. 2021 मध्ये त्यांचा मुलगा अगस्त्यचा जन्म झाला. परंतु जुलै 2024 मध्ये दोघांनीही एकत्र निवेदनाद्वारे वेगळे होत असल्याचा निर्णय घेतला होता. दोघांनी सांगितले की ते चार वर्षे एकत्र राहत होते आणि त्यांचे नाते टिकवून ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु शेवटी त्यांना वाटले की त्या दोघांसाठी वेगळे होणे हा एक चांगला पर्याय आहे. दोघांनीही हे स्पष्ट केले की ते त्यांचा मुलगा अगस्त्यचे सह-पालक असतील आणि त्याच्या आनंदासाठी सर्व काही करतील.