IND vs AUS 2nd T20 Playing 11: भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होणार! सूर्यकुमार यादव कोणाला देणार संधी?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरा टी20 सामना तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड मैदानात होणार आहे. या सामन्यात भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यातील कामगिरी आणि खेळपट्टीचा अंदाज घेऊन बदल करू शकतो. चला जाणून घेऊयात दुसऱ्या टी20 सामन्यात काय बदल होणार ते
मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ दुसऱ्या टी20 सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. आता दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून 2-0 ने आघाडी घेत ऑस्ट्रेलियाला बॅकफूटला ढकलण्याचा प्लान असेल. दुसऱ्या टी20 सामन्यात सूर्यकुमार यादव काही बदलांसह उतरू शकतो. प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल करण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात गोलंदाजांनी हवी तशी छाप सोडली नव्हती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 208 धावा केल्या आणि विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं. भारतीय फलंदाजांनी हे खडतर आव्हान शेवटच्या चेंडूवर पूर्ण केलं. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात काही गोलंदाजांवर तडी पडू शकते. मुकेश कुमार व्यतिरिक्त एकही गोलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे गोलंदाजीत काही बदल होऊ शकतो.
तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफील्ड मैदानातील खेळपट्टी जवळपास विशाखापट्टणम सारखीच आहे. त्यामुळे मागच्या सामन्यातील काही चुका दुरूस्त करण्याचा सूर्यकुमार यादव याचा मानस असेल. फिरकीपटून रवि बिश्नोई याने 13.50 च्या सरासरीने धावा दिल्या होत्या. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून डावललं जाऊ शकतं. अर्शदीप सिंह आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी देखील महागडी षटकं टाकली होती. अर्शदीपने 10.25 आणि प्रसिद्ध कृष्णाने 12.50 च्या सरासरीने धावा दिल्या होत्या. त्यामुळे या तिघांपैकी एकाला बेंचवर बसावं लागू शकतं.
पहिल्या टी20 सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकीपटू होते. त्यामुळे रवि बिश्नोई याला बसवण्याची दाट शक्यता आहे. अक्षर पटेल बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही ठिकाणी चमकदार कामगिरी करू शकतो. त्यामुळे बिश्नोई ऐवजी प्लेइंग इलेव्हनमध्ये आवेश खानला संधी मिळू शकते. तर फिरकीपटूची उणीव भरून काढण्यासाठी तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांचा पर्याय वापरला जाऊ शकतो.
ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही बदल होणार यात काही शंका नाही. तन्वीर संघा हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला होता. तर मॅथ्यू शॉर्ट आणि एरॉन हार्डी हवी तशी कामगिरी करू शकले नाहीत. त्यामुळे या तीन खेळाडूंसाठी पर्याय निवडला जाऊ शकतो. ट्रेव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल आणि एडम झाम्पा यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
ऑस्ट्रेलिया: ट्रॅव्हिस हेड/मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, मॅथ्यू वेड (कर्णधार/ विकेटकीपर), सीन एबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, एडम झाम्पा.
भारत: ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंह, अक्षर पटेल, रवि बिश्नोई/आवेश खान, अर्शदीप सिंह, मुकेश कुमार, प्रसिद्ध कृष्णा.