Video: ‘टेंशन घेऊ नका IND-PAK फायनल होणार’, रोहितकडून पत्रकारांच्या प्रश्नांवर गंमतीशीर उत्तरं

श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे टीम इंडियाचा आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग बिकट बनलाय.

Video: 'टेंशन घेऊ नका IND-PAK फायनल होणार', रोहितकडून पत्रकारांच्या प्रश्नांवर गंमतीशीर उत्तरं
hardik pandya rohit sharmaImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Sep 07, 2022 | 7:02 PM

मुंबई: श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे टीम इंडियाचा आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग बिकट बनलाय. श्रीलंकेकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय चाहतेही निराश आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये आशिया कपची फायनल व्हावी, अशी चाहत्यांची इच्छा होती. पण आता असं होण्याची शक्यता कमी आहे.

भारत-पाक फायनल पहायला मिळेल का?

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्माचा खास अंदाज चाहत्यांना आवडला. प्रेस कॉन्फरन्स दरम्यान एका पत्रकाराने रोहित शर्माला प्रश्न विचारला. रोहित भाई चाहत्यांना भारत-पाकिस्तानमध्ये फायनल पहायची होती. आम्हाला भारत-पाक फायनल पहायला मिळेल का? त्यावर हिटमॅनने गमतीशीर उत्तर दिलं.

भाई तू टेंशन नको घेऊ

‘भाई तू टेंशन नको घेऊ. भारत-पाकिस्तानमध्येच फायनल होईल’ रोहितने एवढ बोलताच तिथे उपस्थित पत्रकारांनी टाळ्यांचा कडकडाट केला. रोहितला सुद्धा आपलं हसू आवरता आलं नाही.

रोहितची तुफानी बॅटिंग

श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने पहिली फलंदाजी केली. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 173 धावा केल्या. कॅप्टन रोहितने तुफानी बॅटिंग केली. त्याने 41 चेंडूत 72 धावा चोपल्या. त्याच्याच फलंदाजीच्या बळावर भारताने 8 विकेट गमावून 174 धावांच लक्ष्य दिलं. टीम इंडियाचा या मॅचमध्ये 6 विकेटने पराभव झाला.

तर भारताच्या आशा जिवंत राहतील

आज अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे. त्या मॅचमध्ये कोण जिंकतं? त्यावर टीम इंडियाचा पुढचा प्रवास अवलंबून असेल. पाकिस्तानची टीम जिंकली, तर टीम इंडियाचा प्रवास संपेल. उद्या अफगाणिस्तानविरुद्धचा सामना औपचारिकता मात्र असेल. पण अफगाणिस्तानची टीम जिंकली, तर भारताच्या आशा जिवंत राहतील.

वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
'सुरेश धस माझ्या मुलाला..', कराडच्या आईचं परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या.
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर
'आपला पक्ष काँग्रेस झालाय', बड्या नेत्याचा उद्धव ठाकरे गटाला घरचा आहेर.
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?
'...आणि सरपंचाला संपवलं', वारंवार फोन करून देशमुखांना बोलवणारा कोण?.
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?
साताऱ्यातून जाऊन दाखव... लक्ष्मण हाकेंना कोणी दिली धमकी?.