Team India च्या या 2 दिग्गज खेळाडूंचं करिअर संपुष्टात, अंतर्गत राजकारणाचे ठरले बळी?

| Updated on: Mar 17, 2023 | 10:28 AM

टीम इंडियाच्या दोन स्टार क्रिकेटपटूंची कारकीर्द जवळपास संपुष्टात आल्याचं म्हटलं जात आहे. बीसीसीआयने अचानक या दोन दिग्गज क्रिकेटपटूंना टीम इंडियातून वगळले आहे.

Team India च्या या 2 दिग्गज खेळाडूंचं करिअर संपुष्टात, अंतर्गत राजकारणाचे ठरले बळी?
Follow us on

मुंबई : टीम इंडियात ( Team India ) खेळण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. अनेक जण टीममध्ये संधी मिळावी म्हणून प्रतिक्षेत आहेत. काही जणांना संधी मिळाल्यानंतर ही ते काही खास कामगिरी न करु शकल्याने संघातून बाहेर झाले. नंतर चांगली कामगिरी करुन देखील लवकर संघात स्थान मिळणं कठीण होतं. टीम इंडियात दोन मोठ्या क्रिकेटपटूंची कारकीर्द जवळपास संपली आहे. बीसीसीआयने ( BCCI ) या दोन दिग्गज क्रिकेटपटूंना टीम इंडियातून वगळले आहे. त्यामुळे टीम इंडियात या दोन क्रिकेटपटूंसाठी पुन्हा परतणे खूप कठीण आहे. या दोन क्रिकेटपटूंसाठी भारतीय क्रिकेट संघाचे दरवाजे बंद झाले आहेत. शेवटच्या सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’चा पुरस्कार पटकावल्यानंतरही या क्रिकेटपटूंना टीम इंडियातून वगळण्यात आले.

1. अमित मिश्रा ( Amit Mishra )

टीम इंडियाचा डॅशिंग लेग-स्पिनर अमित मिश्राने 29 ऑक्टोबर 2016 रोजी विशाखापट्टणम येथे न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळलाय. या सामन्यात अमित मिश्राने ( Amit Mishra )आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घातला. 6 ओव्हर टाकत त्याने 18 धावा देऊन 5 बळी घेतले होते. अमित मिश्रा या सामन्यात ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला होता. पण या एकदिवसीय सामन्यानंतर तो पुन्हा टीम इंडियासाठी या फॉरमॅटमध्ये खेळताना तो दिसला नाही. टीम इंडियाच्या अंतर्गत राजकारणाचा बळी ठरल्याने अमित मिश्राची वनडे कारकीर्द इथेच संपली.

2. भुवनेश्वर कुमार ( Bhuvneshwar Kumar )

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार 2018 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या जोहान्सबर्ग कसोटी सामन्यात त्याच्या सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर ‘मॅन ऑफ द मॅच’ ठरला होता, पण त्यानंतर त्याची कसोटी कारकीर्द जवळपास संपुष्टात आली होती. भुवनेश्वर कुमारला ( Bhuvneshwar Kumar ) भारताच्या कसोटी संघात संधी मिळाली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये भुवनेश्वर कुमार ही टीम इंडियाची सर्वात मोठी ताकद होती. भुवनेश्वर कुमार दोन्ही बाजूंनी स्विंग करून विकेट मिळवायचा आणि गरज पडली तर फलंदाजीने चांगली कामगिरी करून भारतीय संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढायचा.

भुवनेश्वर कुमारने 2018 मध्ये जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात 63 धावा केल्या आणि 4 मोठ्या विकेट्सही घेतल्या. सध्या भुवनेश्वर कुमारला कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळण्याची संधी मिळेल असं दिसत नाही.