T20 world Cup 2021: भारतीय संघात 5 फिरकी गोलंदाज, इतके फिरकीपटू घेण्यामागे ‘हे’ आहे कारण

भारताने टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या संघात तीन मुख्य वेगवान गोलंदाजा संघात असून पाच फिरकीपटू आहेत. तर केवळ हार्दीक हा एक अष्टपैलू वेगवान गोलंदाज आहे.

T20 world Cup 2021: भारतीय संघात 5 फिरकी गोलंदाज, इतके फिरकीपटू घेण्यामागे 'हे' आहे कारण
भारतीय संघ
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 11:50 AM

दुबई : आगामी आयसीसी टी-20 विश्व चषकासाठी (T 20 World Cup 2021) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारतीय संघाची (Team India for WC) घोषणा बुधवारी (8 सप्टेंबर) केली. 15 सदस्य असणाऱ्या या संघासोबत  3 राखीव खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे. विराट कोहलीच्या या टोळीत एक खास गोष्ट म्हणजे संघात वेगवान गोलंदाजाच्या तुलनेत अधिक फिरकीपटू घेण्यात आले आहेत. मुख्य 15 खेळाडूंच्या संघातच 5 फिरकीपटूंचा समावेश आहे. तर 3 प्रमुख गोलंदाज असून  6 प्रमुख फलंदाजांसह हार्दिक पंड्या चौथा वेगवान गोलंदाज आणि सातवा फलंदाज म्हणून खेळणार आहे. अशी संघ निवड पाहता कोणालाही इतके जास्त फिरकीपटू का घेतले? हाच प्रश्न पडेल. तर याचच उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत.

तर भारतीय संघाचा हा निर्णय बरोबर की चूक हे तर सामने सुरु झाल्यावरच कळेल. पण असा निर्णय घेण्यामागे काय कारण असू शकते. हे मात्र नक्कीच सांगितले जाऊ शकते. विश्वचषकाचे सामने हे युएईमध्ये होणार आहेत. दुबई, शारजाह आणि अबुधाबीच्या मैदानात होणाऱ्या या सामन्यांच फिरकीपटूंसाठी काही तुलनेत अधिक फायदा आहे. त्यातच आतापर्यंतच्या क्रिकेट इतिहासात या मैदानात वेगवान गोलंदाजाना खास फायदा झालेला नाही.

3 मैदानात 31 सामने

4 मे, 2021 रोजी कोरोनाच्या संकटामुळे भारतात सुरु असलेली आयपीएल थांबवण्यात आली होती. आता हीच आयपीएल 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होणार आहे. यंदाच्या आय़पीएलमध्ये 60 सामने असून आतापर्यंत 29 सामने खेळवले गेले आहेत. त्यामुळे उर्वरीत 31 सामने आता युएईत होतील. हे सर्व सामने दुबई, शारजाह आणि अबुधाबीच्या तीनच मैदानात होणार असल्याने साहजिकच खेळपट्टी खेळून खेळून स्लो होणार ज्यामुळे फिरकीपटूंना अधिक फायदा होईल.

टी- 20 विश्वचषकासाठी भारतीय संघ – 

भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सार पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

या ठिकाणी रंगणार विश्वचषकाचे सामने

आधी भारतात पार पडणारा टी-20 विश्वचषक कोरोनाच्या संकटामुळे आता युएई आणि ओमान देशांत खेळवला जाणार आहे. काही दिवासांपूर्वीच बीसीसीआय़ आणि आयसीसी यांनी संयुक्त बैठकीतून हा निर्णय घेतला होता. दरम्यान युएई आणि ओमानमध्ये पार पडणाऱ्या या स्पर्धेचे सामने  दुबई इंटरनॅशनल स्टेडियम, शेख जायद स्टेडियम (अबु धाबी), शारजाह स्टेडियम आणि ओमान क्रिकेट अॅकेडमी मैदान याठिकाणी खेळवले जाणार आहेत.

हे ही वाचा :

T 20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, अश्विनला संधी, शार्दूल ठाकूर रिजर्वमध्ये, धोनी मेंटरच्या भूमिकेत

गब्बरच्या आयुष्यातलं वादळ शमेना, पहिल्यांदा घटस्फोट आता BCCI कडून शिखर धवनला मोठा झटका

(This is the reason why Indian team took 5 spinners for icc t20 world cup 2021)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.