अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी हा स्टार खेळाडू दोषी, क्रिकेटविश्वात खळबळ

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणात एका क्रिकेटरला दोषी ठरवण्यात आले आहे. हा खेळाडू एका संघाचा कर्णधार आहे. न्यायालयाने या प्रकरणात त्याला दोषी ठरवले आहे. त्यामुळे या खेळाडूचे क्रिकेट करिअर धोक्यात आले आहे. त्याला इतर देशात खेळायला जाण्यासही बंदी घालण्यात आली होती.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी हा स्टार खेळाडू दोषी, क्रिकेटविश्वात खळबळ
cricket
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 8:25 PM

मुंबई : क्रिकेट विश्वात एका बातमीने खळबळ उडाली आहे. कारण नेपाळ संघाचा स्टार क्रिकेटर संदीप लामिछाने याचे क्रिकेट करिअर धोक्यात आले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, नेपाळ न्यायालयाने स्टार फिरकी गोलंदाजाला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. एका १७ वर्षीय तरुणीने नेपाळ संघाचा कर्णधार असलेल्या संदीपवर आरोप केला होता की, क्रिकेटरने तिला हॉटेलच्या खोलीत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.

संदीप लामिछाने यांची कारकीर्द धोक्यात

अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नेपाळ न्यायालयाने संदीप लामिछानेला दोषी ठरवले आहे. संदीपवर काठमांडू जिल्हा न्यायालयाने १७ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी संदीपला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याची कोठडीत रवानगीही केली होती. मात्र, २० लाखांच्या जामिनावर संदीपची सुटका करण्यात आली.

बिग बॅश लीग आणि आयपीएलमध्ये खेळलेल्या संदीपला परदेशी लीगमध्ये भाग घेण्यासही न्यायालयाने बंदी घातली होती. त्यामुळे आता त्याचे करिअरही धोक्यात आले आहे.

पुढील सुनावणीत शिक्षेबाबत निर्णय

संदीप लामिछानेची जामिनावर सुटका झाली असून या काळात त्याने देशाच्या वतीने अनेक स्पर्धांमध्ये भागही घेतला. संदीपचे क्रिकेट करिअरही आता धोक्यात आले आहे. मात्र, संदीपच्या शिक्षेबाबत न्यायालयाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. संदीपच्या शिक्षेबाबत पुढील सुनावणीत निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.

संदीपची आंतरराष्ट्रीय कारकीर्द

संदीप लामिछानेने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी नेपाळसाठी १०० हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 2018 मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या संदीपने आतापर्यंत खेळलेल्या एकूण 51 एकदिवसीय सामन्यांमध्ये 112 विकेट घेतल्या आहेत. यासोबतच टी-20 इंटरनॅशनलमध्ये या फिरकी गोलंदाजाने 52 सामन्यात 98 विकेट घेतल्या आहेत.

संदीप दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला आहे

संदीप लामिछाने आयपीएलमध्ये खेळणारा नेपाळचा पहिला खेळाडू ठरला आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या वतीने 2018 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये संदीपने पदार्पण केले. संदीपने या लीगमध्ये एकूण दोन हंगामात भाग घेतला आणि एकूण 13 विकेट्स आपल्या नावावर केल्या. 2019 पासून, कोणत्याही संघाने त्याला आयपीएलमध्ये घेण्यास फारसा रस दाखवला नाही.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.