Marathi News Sports Cricket news This Players Including Ishan Kishan Haidar ali Tymal mills and tabraiz shamsi will play important role in T20 World cup People is Eager to watch them
T20 World Cup 2021 मध्ये या खेळाडूंवर असतील सर्वांच्या नजरा, एकजण तर चार वर्षानंतर करणार पुनरागमन
कोरोनाच्या संकटामुळे भारतातून य़ुएईमध्ये हलवण्यात आलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषकाला अखेर सुरुवात होत आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर अशा जवळपास महिनाभर चालणाऱ्या या भव्य स्पर्धेत काही खेळाडूंवर प्रेक्षकांचे खास लक्ष असेल.
1 / 6
आयपीएल (IPL 2021) संपून आता टी20 विश्वचषकाला (T20 World Cup) सुरुवात झाली आहे. तब्बल 5 वर्षानंतर होणाऱ्या या विश्वचषकात जागतिक क्रिकेटमध्ये अनेक नवे चेहरे आले असून आगामी स्पर्धेत प्रेक्षकांची खास नजर असणारे खेळाडू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 6
यावेळी भारतीय संघाचा विचार करता युवा फलंदाज इशान किशनवर अनेकांच्या नजरा असतील. इंग्लंडलविरुद्ध मार्चमध्ये टी20 डेब्यू करणाऱ्या इशानने 32 चेंडूत 52 धावा सलामीच्या सामन्यात ठोकल्या त्यानंतर आता आयपीएलमध्ये त्याने खास कामगिरी नसली केली तरी काही सामन्यात त्याने चुनूक दाखवली खरी. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर अनेकांचे लक्ष असेल.
3 / 6
यानंतर पाकिस्तान संघाचा हैदर अली यालाही बघण्यासाठी क्रिकेटरसिक उत्सुक असतील. काही महिन्यांपूर्वी युएईच्या दौऱ्यात कोविडच्या नियमांचे उल्लघंन केल्याप्रकरणी मायदेशी परतवणाऱ्या हैदरला विश्वचषकात घेतील असे वाटत नव्हते. पण नॅशनल टी20 कपमध्ये दमदार फलंदाजी केल्यामुळे त्याला संघात स्थान मिळाले असून या 21 वर्षीय फलंदाजावर पाकिस्तानी जनतेचे लक्ष असेल.
4 / 6
यावेळी इंग्लंड संघातून एक जुना खेळाडू पुनरागमन करत असून त्याचं नाव आहे टायमल मिल्स. आयपीएलही खेळलेला मिल्स जवळपास चार वर्षानंतर पुनरागमन करत असून तो त्याच्या भेदक गोलंदाजीची कमाल करणार का? हे पाहावे लागेल.
5 / 6
न्यूझीलंड संघाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन फिलिप्स जो चौकारांहून अधिक षटकार ठोकतो त्याच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष आहे. त्याने नुकतेच द हंड्रेड, कॅरिबियन प्रीमियर लीगमध्ये दमदार फलंदाजी केली असून टी20 विश्वचषकात तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे.
6 / 6
जगातील टॉप टी20 गोलंदाज असणारा दक्षिण आफ्रीकेला तबरेज शम्सी यंदा त्यांच्या संघाला टी20 विश्वचषक मिळवून देणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे. तबरेजच्या फिरकीची जादू टी20 क्रिकेटमध्ये उत्कृष्ट चालली असल्याने विश्वचषकातही तो अशीच कामगिरी करतो का? हे पाहावे लागेल.