कसोटी संघात अजिंक्य रहाणेचं स्थान डळमळीत, ‘हा’ खेळाडू घेऊ शकतो जागा, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूने सांगितले कारण
सध्याच्या भारतीय कसोटी संघातील विश्वासू फलंदाज असणाऱ्या रहाणेची बॅट इंग्लंड दौऱ्यात चाललीच नाही. एका अर्धशतकाशिवाय त्याला साधा 20 धावांचा आकडाही पार करता आला नाही. त्यामुळे त्याच संघातील स्थान डळमळीत झाल्याचं वक्तव्य एका दिग्गज क्रिकेटपटूने केलं आहे.
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) मागील काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये दमदार खेळ केला आहे. भारताने दिग्गज ऑस्ट्रेलिया संघाला त्यांच्याच भूमीत मात देत गावस्कर बॉर्डर ट्रॉफी मिळवली. भारताच्या या कामगिरीवर ऑस्ट्रेलिया संघाचे माजी कर्णधार इयान चॅपल (Ian Chappell) बरेच खुश झाले आहेत. सद्यस्थितीला भारताला पराभूत करणं फार अवघड असल्याचं त्यांनी म्हटलं. पण सोबतच कसोटी संघातील दिग्गज खेळाडू आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणेची संघातील जागा आणि त्याचा फॉर्म यावरही त्यांनी भाष्य केलं. त्यांनी कसोटी संघात काही सुधार करुन पाचव्या नंबरच्या स्थानावर एखाद्या दुसऱ्या खेळाडूला संधी द्यायला हवी असं म्हटलं आहे.
चॅपल यांनी इएसपीएनक्रिकइंफोला दिलेल्या माहितीत म्हचलं की,“ भारताच्या मध्य क्रमामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे. पंत अधिक काळ विकेकिंपींग करत असल्याने त्याला खाली फलंदाजीला पाठवायला हवं. तसंच भारताची फलंदाजी आणखी ताकदवर बनवण्यासाठी आणि गोलंदाजीतही वेगवान गोलंदाज वाढवण्यासाठी हार्दिक पंड्याचा संघात समावेश करायवा हवा.”
धावांची गती वाढेल
चॅपल यांच्या मते पंत, जाडेजा आणि पंड्या या तिघांमध्ये वेगाने धावा करण्याची ताकद आहे. त्यामुळे कसोटी सामन्यात एक वेळ अशी येते जेव्हा वेगवान धावा बनवाव्या लागतात. त्यावेळी हे तिघे उपयोगी पडू शकतात. तसेच दोन फिरकीपटू खेळवल्यास एक वेगवान गोलंदाज कमी पडला तरी पंड्या ही जागा घेऊ शकतो.”
इंग्लंडच्या मालिकेत रहाणे
इंग्लंड मालिकेत सुरुवातीपासूनच अजिंक्यला त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करता येत नसून तो संपूर्ण मालिकेत केवळ 109 धावा करु शकला आहे. यामध्ये लॉर्ड्सच्या कसोटीत त्याने दुसऱ्या डावात मधली फळी सांभाळत 61 धावा केल्या होत्या. याशिवाय मालिकेत त्याला साधा 20 धावांचा आकडाही पार करता आलेला नाही. अजिंक्यने पहिल्या कसोटीत भारताच्या पहिल्या डावात केवळ 5 धावा केल्या. त्या सामन्यात भारताला पावसामुळे दुसऱ्यांदा फलंदाजी करता आली नाही. ज्यानंतर दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात एक धाव करुन बाद झालेल्या अजिंक्यने दुसऱ्या डावांत मात्र 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
दुसऱ्या कसोटीनंतर रहाणे पुन्हा पुनरागमन करेल असे वाटत असतानाच तिसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 18 आणि दुसऱ्या डावात 10 धावा करत त्याने पुन्हा सर्वांची निराशा केली. त्यानंतर चौथ्या कसोटीत पहिल्या डावात केवळ 14 धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात रहाणेला साधे खातेही खोलता आले नाही. त्यानंतर पाचवी कसोटी रद्द झाली असल्याने रहाणे आता पुढील दौऱ्यात संघात असणार का? यावर प्रश्नचिन्हच आहे.
इतर बातम्या
IPL 2021 सुरु होण्यापूर्वीच ‘हा’ फलंदाज मैदानावर उडवतोय धुरळा, 7 षटकार ठोकत संघाला मिळवून दिला विजय
(This three can take ajinkyas place in indian test squad says ian chappel)