T20 World Cup: यंदाच्या टी-20 विश्वचषकात एकही माजी विजेता कर्णधार नाही, सर्व यादी पाहा एका क्लिकवर

17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकासाठी भारतासह सर्वच देशांनी आप आपले संघ जाहीर केले आहेत. यावेळी अनेक संघात नवे बदल झाले आहेत.

T20 World Cup: यंदाच्या टी-20 विश्वचषकात एकही माजी विजेता कर्णधार नाही, सर्व यादी पाहा एका क्लिकवर
टी-20 विश्वचषक
Follow us
| Updated on: Sep 14, 2021 | 2:55 PM

T20 World Cup: युएईमध्ये यंदा होणाऱ्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषकासाठी (ICC T 20 World Cup) सर्व देशांनी आपआपले संघ जाहीर  केले आहेत. यावेळी विशेष गोष्ट म्हणजे एकाही संघाचा कर्णधार असा नाही ज्याने याआधी विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे जोही संघ ही स्पर्धा जिंकेल, त्याचा कर्णधार हा पहिल्यांदाच विजयाचा मानकरी ठरेल. यंदा टी20 वर्ल्ड कपमध्ये 12 संघ खेळणार असून यातील 8 संघाना सरळ एन्ट्री मिळाली असून इतर 4 जागांसाठी पात्रता सामने खेळवले जाणार आहेत.

यंदा या स्पर्धेचं आयोजन आधी भारतात होणार होतं. पण कोरोनाच्या संकटामुळे ही स्पर्धा आता युएईत होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता सर्व सामने हे युएई आणि ओमान या देशात होणार आहेत. भारत टी-20 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप बीमध्ये असणार आहे. या ग्रुपमध्ये पाकिस्तान संघासोबतच्या सामन्याची सर्वजण वाट पाहत असून 24 ऑक्टोबरला हा सामना खेळवला जाणार आहे.

पाचही चॅम्पियन कर्णधार निवृत्त

आतापर्यंत सहा वेळा टी20 वर्ल्ड कप खेळवला गेला आहे. यावेळी केवळ वेस्ट इंडीज संघाने दोनदा ही स्पर्धा जिंकली आहे. त्याशिवाय भारत, पाकिस्तान, इंग्लंड, पाकिस्तान आणि श्रीलंका संघाने एक-एकदा स्पर्धा जिंकली आहे. दरम्यान यावेळी प्रत्येक संघाच्या विजयाचा शिल्पकार असणारे कर्णधार या खेळातून निवृत्त झाले आहेत. यात भारताकडून महेंद्र सिंह धोनी, पाकिस्तानकडून यूनु्स खान, इंग्लंडकडून पॉल कॉलिंगवुड, वेस्ट इंडिजकडून डॅरेन सामीने आणि श्रीलंकेकडून लसिथ मलिंगा यांनी विश्वचषक जिंकला होता. हे पाचही जण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.

यंदाचे विश्वचषकात सहभाग घेणारे संघ

इंग्लंड (England): इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेयरस्टो, सैम बिलिंग्स, जॉस बटलर, सैम करन, क्रिस जॉर्डन, लियम लिविंगस्टन, डेविड मलान, टेमाल मिल्स, आदिल रशीद, जेसन रॉय, डेविड विली, क्रिस वोक्स और मार्क वुड | राखीव: टॉम करन, जेम्स विंस आणि लियाम डॉसन.

बांग्लादेश (Bangladesh): महमुदुल्लाह (कर्णधार), मोहम्मद नईम, लिटन दास (यष्टीरक्षक), शाकिब अल हसन, सौम्य सरकार, मुश्फ़िकुर रहीम, अफ़ीफ़ हुसैन, नुरुल हसन, महेदी हसन, नासूम अहमद, मुस्ताफ़िज़ुर रहमान, शोरीफ़ुल इस्लाम, तस्कीन अहमद, मोहम्मद सैफ़ुद्दीन, शमीम हुसैन. राखीव: रुबेल हुसैन, अमीनुल इस्लाम बिप्लब

अफगानिस्तान (Afghanistan) : राशिद खान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), हजरतुल्लाह जजाई (यष्टीरक्षक), उस्मान गनी, असगर अफगान, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह जादरान, हशमतुल्लाह शाहिदी, मोहम्मद शहजाद, मुजीब उर रहमान, करीम जनत, गुलबदीन नईब, नवीन उल हक, हमीद हसन, शरफुद्दीन अशरफ, दौलत जादरान, शफूर जादरान आणि कैस अहमद.

न्यूझीलंड (New Zealand): केन विलियमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डेवन कॉनवे, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, टिम सीफर्ट (यष्टीरक्षक), मिचेल सेंटनर, ईश सोढ़ी, ग्लेन फिलिप्स, जिम्मी नीशम, डेरिल मिचेल, काइल जॅमिसन, लॉकी फर्ग्यूसन, मार्क चेपमैन आणि टॉड एस्टल.

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकुर

पाकिस्तान (Pakistan): बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिल अली, आजम खान, हैरिस रउफ, हसन अली, इमाद वसीम, खुशदिल शाह, मोहम्मद हफीज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिज़वान, मोहम्मद वसीम, शोएब मकसूद, शाहीन शाह अफरीदी | राखीव- फखर जमां, उस्मान कादिर, शाहनवाज दहानी

ऑस्ट्रेलिया (Australia): एरॉन फिंच (कर्णधार), डेविड वॉर्नर, मॅथ्यू वेड, स्टीव स्मिथ, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मैक्सवेल, जॉश इंग्लिस, मिचेल मार्श, ऐश्टन ऐगर, पॅट कमिन्स, जॉश हेजलवुड, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, केन रिचर्डसन आणि एडम जाम्पा.

दक्षिण अफ्रीका (South Africa): टेम्बा बावुमा (कर्णधार), केशव महाराज, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), बजोर्न फॉर्टयूइन,रीजा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, एडिन मार्कराम, डेविड मिलर, डब्ल्यू मुल्डर, लुंगी नगिदी, एनरिख नॉर्खिया, ड्वायन प्रीटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, रासी वान डर डुसैन | राखीव: जॉर्जी लिंडे, एंडिले फेहुलक्वायो, लिजाड विलियम्स.

हे ही वाचा-

विराट कोहली नेमकं कोणत्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडणार?

IPL 2021: सलामीला येत ‘हे’ धुरंदर उधळतात जलवा, पाहा कोण आहेत हे दिग्गज!

T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर ‘या’ खेळाडूवर जबाबदारी

(This years T20 World Cup squads includes no Ex winning captain)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.