Team India : टीम इंडियाची निवड करताना रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्याकडून तीन चुका! काय ते वाचा

वेस्ट इंडिज दौरा असला तरी टीम इंडियाची भविष्याच्या दृष्टीकोनातून पायाभरणी सुरु आहे. टीम इंडियातील काही खेळाडूंची चाचपणी करून त्यांचा भविष्यासाठी विचार केला जाणार आहे. असं असलं तरी तीन चुका केल्या आहेत.

Team India : टीम इंडियाची निवड करताना रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्याकडून तीन चुका! काय ते वाचा
Team India : टीम इंडियाची निवड करताना रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्याकडून तीन चुका!
Follow us
| Updated on: Jun 23, 2023 | 9:24 PM

मुंबई : दुधाने तोंड पोळले की ताकही फुंकून प्यायचं असतं, पण या म्हणीतून बीसीसीआयने काय धडा घेतलेला दिसत नाही. भविष्याच्या दृष्टीकोनातून पायाभरणी करत असताना निवड समितीने चुका केल्याचं दिसून आहे. वेस्ट इंडिज दौऱ्याच्या दोन कसोटी आणि 3 वनडे सामन्यासाठी टीम इंडियाची निवड केली आहे. चेतेश्वर पुजाराला टेस्ट संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्याच्या जागेवर ऋतुराज गायकवाडला संघात संधी मिळाली आहे. तसेच त्याला वनडे संघातही स्थान मिळालं आहे. त्याचबरोबर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात टीम इंडियाच्या रिझर्व्ह खेळाडूमध्ये यशस्वी जयस्वालची निवड केली होती. त्यालाही कसोटी संघात स्थान मिळालं आहे. तसं पाहिलं तर निवडलेला संघ जबरदस्त आहे. पण तीन चुका केल्याचं दिसून येत आहे. यामुळे टीम इंडियाचं भविष्यात मोठं नुकसान होऊ शकतं. चला जाणून घेऊयात याबाबत…

पहिली चूक

अजिंक्य रहाणे याला वेस्ट इंडिज दौऱ्यात उपकर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. निवड समितीचा हा निर्णय क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का देणारा राहीला आहे. अजिंक्य रहाणे 35 वर्षांचा आहे. तर कर्णधार रोहित शर्मा 36 वर्षांचा झाला आहे. त्यांचं वय आणि फिटनेस पाहता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिफ 2023-2025 साठी खेळणं कठीण दिसत आहे. त्यामुळे उपकर्णधारपदाची धुरा युवा खेळाडूच्या खांद्यावर देणं गरजेचं होतं, अशी चर्चा क्रीडाप्रेमी करत आहेत.

शुभमन गिल चांगला पर्याय ठरू शकला असता. पण निवडकर्त्यांनी रहाणेंच्या उपकर्णधारपदाची माळ घातली. अजिंक्य रहाणेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्येच संघात पुनरागमन केलं होतं आणि एक सामना खेळताच उपकर्णधारपद सोपवलं आहे. त्या तुलनेत शुभमन गिल चांगला फॉर्मात असून भविष्यात चांगला पर्याय ठरला असता.

दुसरी चूक

टीम इंडियाची निवड करताना कायम गोलंदाजीकडे दुर्लक्ष केलं जातं असं वाटतं. वेगवान गोलंदाजीबाबत असंच काहीसं म्हणावं लागेल. डावखुरा गोलंदाज जयदेव उनाडकटची दोन्ही संघात निवड केली आहे. 24 वर्षीय उनाडकटकडे वेग आणि स्विंग दोन्ही आहेत. त्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत लाल चेंडूवर चांगली कामगिरी केली आहे. त्याच्यासोबत अर्शदीप सिंग याला संधी देता आली असती.  वनडेमध्ये उनाडकट आणि अर्शदीपला स्थान दिलं असतं तर एकाची परख करता आली असती.

तिसरी चूक

वेस्ट इंडिज दौऱ्यात आर. अश्विन, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांची निवड करण्यात आली आहे. हे तिघेही फिंगर स्पिनर्स आहे. कसोटी संघात एक रिस्ट स्पिनर असणं गरजेचं असतं. बॉर्डर गावस्कर मालिकेत कुलदीप यादव संघात होता. मात्र आता त्याला स्थान दिलेलं नाही.

भारतीय टेस्ट टीम- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जायसवाल, अजिंक्य रहाणे, नवदीप सैनी

वनडे टीम- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, हार्दिक पांड्या, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, मुकेश कुमार, कुलदीप यादव,उमरान मलिक, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.