IND vs AUS Final | World Cup च्या फायनलमध्ये टॉस हरण्यातच टीम इंडियाच ‘LUCK’, इतिहासच आहे तसा

IND vs AUS Final | फायलनमध्ये टीम इंडिया टॉस हरली आहे. चालू वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन रोहित शर्माने सतत टॉस जिंकत होता. नेमका आज तो टॉस हरला. म्हणून अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली असेल. पण इतिहासावर एकदा नजर मारा.

IND vs AUS Final | World Cup च्या फायनलमध्ये टॉस हरण्यातच टीम इंडियाच 'LUCK', इतिहासच आहे तसा
IND vs AUS World Cup Final 2023Image Credit source: icc
Follow us
| Updated on: Nov 19, 2023 | 4:26 PM

IND vs AUS World Cup Final | क्रिकेटच्या कुठल्याही सामन्यात टॉस खूप महत्त्वाचा असतो. कारण टॉस विन मॅच विन असं म्हटलं जातं. टॉस जिंकणारा संघ मैदानावरील परिस्थितीनुसार फलंदाजी किंवा गोलंदाजीचा निर्णय घेतो, आज टीम इंडिया ICC वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये फायनलचा सामना खेळत आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ही मॅच सुरु आहे. आज World Cup च्या फायनलमध्ये टॉस हरण्यातच टीम इंडियाच ‘LUCK’, इतिहासच आहे तसा. टॉसचा कौल  ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. खरंतर टॉस जिंकल्यावर रोहितने सुद्धा फलंदाजी घ्यावी, अशी भारतीय चाहत्यांची इच्छा असावी. कारण सेकंड इनिंगमध्ये धावांचा पाठलाग करण सोपं नसतं. मैदानावर पडणारा दव, खेळपट्टी ध्यानात घेऊनच कमिन्सने क्षेत्ररक्षण स्वीकारलं.

टीम इंडियाने सुरुवाती दमदार केली होती. रोहित शर्माने मिचेल स्टार्क, हेझलवूडच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला होता. पण शुभमन गिल अवघ्या 4 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा 47 रन्सवर आणि पाठोपाठ श्रेयस अय्यर 4 रन्सवर तंबूत परतले.. हे तिघेही इनफॉर्म फलंदाज लवकर बाद झाल्याने भारतीय गोटात चिंतेच वातावरण आहे. भारतीय चाहते देखील निराश आहेत. कारण हा वर्ल्ड कप फायनलचा सामना आहे. आज जिंकलो तर ट्रॉफी आपली. पॅट कमिन्सने घेतलेला निर्णय योग्य तर नाही, ना असं अनेकांच्या मनात येतय.

वर्ल्ड कप फायनलमधील टीम इंडिया्च्या टॉसचा इतिहास काय सांगतो?

पण एक इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला माहितीय का?. वर्ल्ड कप फायनलमध्ये आतापर्यंत जितक्यांदा टीम इंडिया टॉस हरलीय. त्या-त्या वेळी वर्ल्ड कप जिंकलाय.

1983 – 83 मध्ये टीम इंडियाने पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी कपिल देव टॉस हरला होता. वेस्ट इंडिजचा कॅप्टन क्लाइव्ह लॉइडने टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारली होती. पण टीम इंडियाने त्यावेळी 43 धावांनी सामना जिंकला होता.

2003 – टीम इंडिया दुसऱ्यांदा वर्ल्ड कपची फायनल खेळत होती. समोर ऑस्ट्रेलियाच आव्हान होतं. टीम इंडियाचा कॅप्टन सौरव गांगुलीने टॉस जिंकला. त्यांनी ऑस्ट्रेलियाला फलंदाजीच आमंत्रण दिलं. ऑस्ट्रेलियाने हा सामना 125 धावांनी जिंकला.

2011 – टीम इंडिया तिसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये होती. त्यावेळी श्रीलंकेचा कॅप्टन कुमार संगकाराने टॉस जिंकून फलंदाजी स्वीकारली. टीम इंडियाने 6 विकेट आणि 10 चेंडू राखून सामना जिंकला.

2023 – टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळत आहे. रोहित शर्मा टॉस हरलाय. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.