Team India Prize Money : आता 125 कोटी नाही, टीम इंडियाला मिळणाऱ्या प्राइज मनीमध्ये प्रचंड वाढ, छप्परफाड पैसा

Team India Prize Money : बार्बाडोसमध्ये टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर बीसीसीआयकडून मोठ्या प्राइज मनीची घोषणा करण्यात आली. आता टीम इंडियाला रोख रक्कमेच्या स्वरुपात जो पैसा मिळणार आहे, त्यात प्रचंड वाढ झाली आहे. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवून टीम इंडियाने दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला.

Team India Prize Money : आता 125 कोटी नाही, टीम इंडियाला मिळणाऱ्या प्राइज मनीमध्ये प्रचंड वाढ, छप्परफाड पैसा
T20 World Cup winning Team India
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 11:34 AM

T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाच सध्या सर्वत्र भव्य स्वागत होतय. विमानात तसच हॉटेलमध्ये वर्ल्ड कप विजेत्या टीममधील खेळाडूंसाठी स्पेशल केक बनवण्यात आले होते. आता हे खेळाडू आपल्या घरी परतत असताना, तिथेही असच भव्य स्वागत करण्यात येतय. वर्ल्ड कप विजेत्या टीममधील खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी ठिकठिकाणी फॅन्सची मोठी गर्दी उसळत आहे. वर्ल्ड कप विजेत्या टीमसाठी बीसीसीआयकडून प्रचंड मोठ्या रक्कमेच्या प्राइज मनीची घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाने 29 जूनला वेस्ट इंडिजच्या बार्बाडोसमध्ये T20 वर्ल्ड कप जिंकला. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला 7 धावांनी हरवून दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप जिंकला.

या विश्वविजेत्या कामगिरीनंतर 30 जूनला दुसऱ्यादिवशी बीसीसीआयकडून वर्ल्ड कप विजेत्या संघासाठी 125 कोटी रुपये प्राइज मनीची घोषणा करण्यात आली. आता या प्राइज मनीच्या रक्कमेत मोठी वाढ झाली आहे. काल महाराष्ट्र विधान भवनाच्या हॉलमध्ये T20 वर्ल्ड कप विजेत्या टीममधील मुंबईच्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. कॅप्टन रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे या चौघांना सन्मानित करण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी T20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला 11 कोटी रुपये इनाम देण्याची घोषणा केली.

प्राइज मनीची एकूण रक्कम किती?

एकनाथ शिंदे यांनी 11 कोटी रुपये इनामाची घोषणा करताच एकूण प्राइज मनीची रक्कम आता 156 कोटीच्या घरात गेली आहे. बीसीसीआयचे 125 कोटी, आयसीसीकडून मिळालेली प्राइज मनीची रक्कम 20 कोटी आणि आता हे 11 कोटी एकूण मिळून ही रक्कम 150 कोटीच्या वर जाते. 125 कोटी प्राइज मनीच्या हिशोबाने T20 वर्ल्ड कप विजेत्या संघातील 15 सदस्यीय खेळाडूंना प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळू शकतात. सपोर्ट स्टाफ आणि राखीव खेळाडूंना प्रत्येकी 1 कोटी रुपये मिळू शकतात.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.