Shikhar Dhawan: ‘वेळ कठीण होती, पण…’, शिखरने शेअर केलं अपयशावर मात करण्याचं सिक्रेट
भारताचा पराभव झाला असला, तरी सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) आपल्या खेळाने सर्वांची मन जिंकून घेतली. बॅड पॅच मधून जात असलेल्या शिखरसाठी ही वनडे मालिका खूप महत्त्वाची आहे.
पार्ल: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa) पहिल्या वनडेमध्ये (First oneday) भारताचा पराभव झाला असला, तरी सलामीवीर शिखर धवनने (Shikhar Dhawan) आपल्या खेळाने सर्वांची मन जिंकून घेतली. बॅड पॅच मधून जात असलेल्या शिखरसाठी ही वनडे मालिका खूप महत्त्वाची आहे. 36 वर्षीय शिखरच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत असताना त्याने मिळालेल्या संधीचे सोनं केलं. शांतपणा व स्पष्टता या दोन गोष्टींमुळे आपण कठीण वेळेवर मात करु शकलो, असे शिखरने सांगितलं.
नकारात्मकतेपासून तू कसा लांब राहतोस?
देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमधील शिखर धवनच्या खराब फॉर्मबद्दल बरच काही बोललं गेलं. पण शिखरने काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 84 चेंडूत 79 धावांची खेळी करुन सर्व प्रश्नांची उत्तर दिली. “मी मीडियाचं ऐकत नाही, वर्तमानपत्र वाचत नाही किंवा बातम्याही पाहत नाही” असं धवनने नकारात्मकतेपासून तू कसा लांब राहतोस, या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. बॅड पॅच पहिल्यांदा आलेला नाही किंवा शेवटचाही नाही. पण तुमचा तुमच्या क्षमतेवर विश्वास असणं आवश्यक आहे असं शिखरने सांगितलं.
पाच सामन्यात शिखरने फक्त 56 धावा केल्या होत्या
“माझा खेळ काय आहे? त्यावर मला विश्वास होता, स्पष्टता होती. मी शांत राहिलो. आयुष्याचा हा एक भाग आहे, असं घडत असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतात, यात नवीन काही नाही. माझ्या करीयरमध्ये हे पहिल्यांदा घडत नाहीय किंवा शेवटचही नाहीय. उलट अशा गोष्टी मला अधिक मजबूत बनवतात” असे धवनने सांगितलं. विजय हजारे करंडक स्पर्धेच्या पाच सामन्यात शिखर धवनने फक्त 56 धावा केल्या होत्या. त्यामुळे त्याच्या फॉर्मबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते.
Tough times made me stronger but needed calm, clarity Shikhar Dhawan after confident 79 in 1st ODI