U19 Final: ‘चॅम्पियन्सकडे नेहमीच सर्वोत्तम सगळं…’ सचिनने फायनलआधी युवा टीम इंडियाला दिला खास संदेश, पाहा VIDEO

नेक आव्हान असूनही तुम्ही खूप चांगल क्रिकेट खेळलय. मला माहितीय काही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली, त्यामुळे ते काही सामने खेळू शकले नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा,

U19 Final: 'चॅम्पियन्सकडे नेहमीच सर्वोत्तम सगळं...' सचिनने फायनलआधी युवा टीम इंडियाला दिला खास संदेश, पाहा VIDEO
Follow us
| Updated on: Feb 05, 2022 | 3:09 PM

गयाना: अँटिंग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्‌स स्टेडियमवर आज भारत आणि इंग्लंडमध्ये अंडर 19 वर्ल्डकपचा अंतिम (ICC Under 19 world cup final) सामना होणार आहे. या सामन्याआधी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) भारताच्या युवा संघाला खास संदेश दिला आहे. सचिनने त्याच्या टि्वटर अकाऊंटवरुन अंडर 19 टीमला फायनलमध्ये विजयासाठी प्रेरीत करणारा एका खास व्हिडिओ संदेश दिला आहे. 2011 वनडे वर्ल्डकपच्या फायनलआधी अपेक्षांचा कसा सामना करायचा? त्यावर चर्चा झाली होती. तो अनुभव सचिनने भारताच्या युवा खेळाडूंसोबत शेअर केला आहे. “अब्जावधी पेक्षा जास्त लोक तुमच्यासोबत आहेत. त्यांची शक्ती तुमच्यासोबत आहे” असं सचिनने टि्वटरवरील त्याच्या व्हिडिओ कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा…. “तुम्ही वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या वर्ल्डकपमध्ये खूप चांगले खेळताय. अनेक आव्हान असूनही तुम्ही खूप चांगल क्रिकेट खेळलय. मला माहितीय काही खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली, त्यामुळे ते काही सामने खेळू शकले नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, चॅम्पियन्सकडे नेहमीच सर्वोत्तम सगळं नसतं, त्यांच्याकडे जे असतं, त्यातून ते सर्वोत्तम घडवतात. याच क्षणाची तुम्ही वाट पाहत नव्हता का? आता वेळ आलीय, तुम्ही मैदानावर जा तुमचा नैसर्गिक खेळ खेळा, व्यक्त व्हा” असा सल्ला सचिनने या मेसेजमधून दिला आहे.

दबाव आणि अपेक्षांचा सामना कसा करायचा? “मला 2011 चा वर्ल्डकप आठवतोय. आम्ही भारतात खेळत होतो. एका चर्चासत्राच्यावेळी दबाव आणि अपेक्षांचा सामना कसा करायचा? यावर चर्चा झाली. त्यावर उत्तर एकच होतं. एक अब्ज लोक आपल्यासोबत आहेत. ते आपल्या डोक्यावर बसलेले नाहीत, तर ते आपल्यासोबत आहेत. कारण फोर्सची दिशा आणि दबाव महत्त्वाचा असतो. माझ्याकडून तुम्हाला ऑल द बेस्ट, मैदानावर जा आणि सर्वोत्तम खेळ दाखवा” असे सचिनने म्हटलं आहे.

भारताचा माजी कर्णधार आणि 2008 च्या अंडर 19 वर्ल्डकप विजेत्या टीमचा कॅप्टन विराट कोहलीने सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत. “वर्ल्डकप फायनलसाठी आमच्या अंडर 19 च्या मुलांना शुभेच्छा” असं कोहलीने त्याच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.