WOMEN IPL मध्ये ‘या’ 4 महिला क्रिकेटपटूंवर पडणार पैशांचा पाऊस, फ्रेंचायजींमध्ये लागणार स्पर्धा

WOMEN IPL : भारताने पहिला अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला. या ऐतिहासिक यशानंतर बीसीसीआयने वर्ल्ड चॅम्पियन टीमसाठी मोठ्या इनामी रक्कमेची घोषणा केलीय.

WOMEN IPL मध्ये 'या' 4 महिला क्रिकेटपटूंवर पडणार पैशांचा पाऊस, फ्रेंचायजींमध्ये लागणार स्पर्धा
Wome team indiaImage Credit source: icc
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 10:05 AM

Indian women Cricketers : भारताच्या मुलींनी संपूर्ण देशाला सेलिब्रेशनची संधी दिलीय. दक्षिण आफ्रिकेत पहिली आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धा झाली. यामध्ये टीम इंडियाने बाजी मारली. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला अंडर 19 महिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला. या ऐतिहासिक यशानंतर बीसीसीआयने वर्ल्ड चॅम्पियन टीमसाठी मोठ्या इनामी रक्कमेची घोषणा केलीय. भारताच्या मुलींवर बक्षिसांचा पाऊस पडतोय. महिला टीममधील प्लेयर्सना विकत घेण्यासाठी पुढच्या महिन्यात फ्रेंचायजींमध्ये चुरस दिसून येईल.

पहिल्या सीजनसाठी लिलाव

पुढच्या महिन्यात महिला आयपीएलच्या पहिल्या सीजनसाठी लिलाव होणार आहे. फ्रेंचायजीची वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंवर नजर असेल. काही खेळाडूंना आपल्या टीममध्ये घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये चुरस दिसून येईल. कोण आहेत त्या खेळाडू?

1 शेफाली वर्मा : शेफाली वर्माला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये स्पर्धा दिसून येईल. टीममधील ती सर्वात अनुभवी खेळाडू आहे. भारताच्या सीनियर टीमचा सुद्धा ती भाग आहे. 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शेफालीने डेब्यु केला. ती भारताकडून 21 वनडे आणि 51 टी 20 सामने खेळली आहे. फ्रेंचायजींची नजर आधीपासूनच तिच्यावर होती. आता वर्ल्ड चॅम्पिन बनल्यानंतर डिमांड आणखी वाढली आहे. टुर्नामेंट सर्वाधिक धावा करणारी ती तिसरी फलंदाज आहे. 7 सामन्यात 193.25 च्या सरासरीने 172 धावा केल्या. टुर्नामेंटमध्ये तिचा सर्वात जास्त स्ट्राइक रेट होता.

2 श्वेता सेहरावत : शेफाली नंतर ऑक्शनमध्ये श्वेता सेहरावतला सर्वात जास्त बोलबाला दिसून येईल. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा तिच्या नावावर आहेत. श्वेताने 7 मॅचेसमध्ये 297 धावा केल्या. तिने 3 अर्धशतकं झळकावली.

3 पार्श्वी चोपडा : महिला आयपीएलमध्ये पार्श्वी चोपडावर सुद्धा फ्रेंचायजींची नजर असेल. ती टुर्नामेंटमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. पार्श्वीने 6 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. वर्ल्ड कपमधील सर्वात जास्त विकेट घेणारी ती गोलंदाज आहे. 4 तितास साधु : वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये तितास साधुला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. तिने वर्ल्ड कपमध्ये आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलं. फायनलमध्ये तितासने 4 ओव्हरमध्ये 6 रन्स देऊन 2 विकेट काढल्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.