वडील-भाऊ गमावला, गरीबीत गेलं बालपण, आता टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी उतरणार मैदानात

अर्चना चार वर्षांची असताना तिच्या वडिलांच निधन झालं. वर्ष 2017 मध्ये सर्प दंशामुळे भावाचा मृत्यू झाला. त्यानंतर आईने मोठ्या कष्टाने घर चालवलं.

वडील-भाऊ गमावला, गरीबीत गेलं बालपण, आता टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी  उतरणार मैदानात
Archna devi Image Credit source: GETTY IMAGES
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 2:02 PM

डरबन – भारतीय महिला टीमने अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये शुक्रवारी न्यूझीलंडवर मात करुन फायनलमध्ये स्थान पक्क केलं. या मॅचमध्ये पार्श्वी चोपडाने सर्वाधिक विकेट घेतल्या. पण मॅचमधील महत्त्वाचा विकेट अर्चना देवीने काढला. तिने न्यूझीलंड टीमसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या प्लिमरला आऊट केलं. या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये अर्चना टीमसाठी महत्त्वाची ठरलीय. देशासाठी वर्ल्ड कपमध्ये खेळणं हे अर्चना देवीसाठी एक स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. उन्नावच्या एका छोट्या गावातून येणाऱ्या अर्चना देवी एका गरीब कुटुंबाशी संबंधित आहे. तिने आपल्या प्रतिभेच्या बळावर टीम इंडियात स्थान मिळवलय. देशाला वर्ल्ड चॅम्पियन बनवण्यासाठी ती उत्सुक आहे.

शाळेत पाठवण्याइतपत तिच्या आईकडे पैसे नव्हते

अर्चना चार वर्षांची असताना तिच्या वडिलांच निधन झालं. वर्ष 2017 मध्ये सर्प दंशामुळे भावाचा मृत्यू झाला. त्यानंतर आईने मोठ्या कष्टाने घर चालवलं. कधी ती शेतामध्ये काम करायची, कधी घरोघर जाऊन दूध विक्री करायची. अर्चनाला शाळेत पाठवण्याइतपत तिच्या आईकडे पैसे नव्हते. ती सरकारी शाळेत शिकायची.

कुलदीप यादवच्या कोचनी अर्चनामधील प्रतिभा हेरली

याच सरकारी शाळेतील पीटी टीचर पूनम गुप्ता यांनी अर्चनामधील प्रतिभा हेरली. तिने अर्चनाच्या क्रिकेट ट्रेनिंगची जबाबदारी संभाळली. तिला कानपूरच्या क्रिकेट अकादमीत पाठवलं. कुलदीप यादवच्या कोचनी अर्चनामधील प्रतिभा हेरली. इथूनच तिच्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले. अर्चनावर फ्रेंचायजीची नजर

रविवारी आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कपची फायनल होणार आहे. या मॅचसाठी अर्चना मैदानात उतरेल. टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचा तिचा प्रयत्न असेल. पुढच्या महिन्यात होणाऱ्या महिला प्रीमियर लीगच्या ऑक्शनमध्ये अर्चनावर फ्रेंचायजीची नजर असेल.

पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.