अँटिग्वा: वेस्ट इंडिजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्डकप (Under19 world cup) स्पर्धेत मध्यमगती गोलंदाज राज बावाच्या (Raj bawa) भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा संघ बॅकफूटवर गेला आहे. राज बावाने अचूक टप्प्यावर गोलंदाजी करुन इंग्लंडची (India vs England) वाट लावून टाकली आहे. आतापर्यंत त्याने इंग्लंडच्या वरच्या फळीतील चार फलंदाजांना तंबुची वाट दाखवली आहे. दमदार फलंदाजी करणारा जॉर्ज थॉमस, विलियम लिक्सटन, जॉर्ज बेल आणि रेहान अहमदची विकेट त्याने काढली. जॉर्ज थॉम्स 27 धावांवर बाद झाला. राज बावाच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात थॉम्स झेलबाद झाला. कॅप्टन यश धुलने त्याचा झेल घेतला. बावाने विलियम लिक्सटन अवघ्या चार धावांवर यष्टीरक्षाकरवी झेलबाद केले. बावाने जॉर्ज बेलला भोपाळाही फोडू न देता शुन्यावर यष्टीरक्षाकरवी झेलबाद केले. दहा धावांवर खेळणाऱ्या रेहान अहमदला त्याने स्लीपमध्ये कौशल तांबेकरवी झेलबाद केले. राज बावाचं हे तुफान इंग्लंडच्या संघाला अजिबात झेपत नाहीय.
कोण आहे राज बावा
राज बावा मध्यमगती गोलंदाजी करणारा ऑलराऊंडर आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या होत्या. युगांडाविरोधात त्याने 108 चेंडूत 162 धावांची खेळी केली होती. यात चौदा चौकार आणि आठ षटकार लगावले. राज बावा अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत एकाडावात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने 2004 मधला स्कॉटलंड विरुद्ध 155 धावांचा शिखर धवनचा विक्रम मोडीत काढला होता.
Wicket No. 4⃣ for Raj Bawa ? ?
6⃣th success with the ball for India U19 in the Final ? ?
Follow the match ▶️ https://t.co/p6jf1AXpsy#U19CWC #BoysInBlue #INDvENG pic.twitter.com/j6d6EfziIX
— BCCI (@BCCI) February 5, 2022
युवराज सिंग आदर्श
राज बावाने युवराज सिंगला पाहून बॅटिंग स्टान्समध्ये बदल केला. माझ्या वडिलांच्या कोचिंग सेंटरमध्ये मी युवराजला फलंदाजी करताना पाहायचो, अशी आठवण राजने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितली. राजची कौटुंबिक पार्श्वभूमी खेळाची आहे. त्याचे आजोबा तारलोचन बावा 1948 सालच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या हॉकी संघाचे कॅप्टन होते.