U19 World Cup, IND vs SA Head to Head : भारताची पहिली लढत तुल्यबळ द. आफ्रिकेशी, जाणून घ्या कोणाचं पारडं जड
19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक (Under 19 Cricket World Cup) स्पर्धेत, भारत (India U19) आजपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. ग्रुप स्टेजमधील भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे.
मुंबई : 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक (Under 19 Cricket World Cup) स्पर्धेत, भारत (India U19) आजपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. ग्रुप स्टेजमधील भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. यश धुलच्या (Yash Dhull) नेतृत्वाखालील भारतीय संघासाठी हे सर्वात मोठे आणि कठीण आव्हान आहे. भारताने हा सामना जिंकल्यास उपांत्यपूर्व फेरी गाठणे जवळपास निश्चित होईल. कारण त्यानंतर पुढील दोन सामन्यांमधील भारतासमोरील आव्हान सोपे होईल. मात्र, विरोधी संघ कसाही असेल त्याला हलक्यात घेऊन चालणार नाही आणि दक्षिण आफ्रिकेबाबत तर असा विचार अजिबात करु नये. भारताच्या अंडर-19 संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा परफॉर्मन्सही कायम ठेवायचा आहे.
भारतीय संघाने आपले दोन्ही सराव सामने जिंकून स्पर्धेची सुरुवात चांगली केली आहे. अंडर-19 टीम इंडियाने आपल्या पहिल्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजच्या अंडर-19 संघाचा पराभव केला. तर दुसऱ्या सराव सामन्यात ऑस्ट्रेलिया अंडर-19 संघाचा पराभव केला. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेचा संघही सराव सामना जिंकून भारताचा सामना करण्यासाठी मैदानात उतरला आहे. दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेला सराव सामना 7 विकेटने जिंकला होता. म्हणजेच आजचा सामना आव्हानात्मक असणार आहे.
U19 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा वरचष्मा
भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघांमध्ये आतापर्यंत झालेल्या सामन्यांचे रिपोर्ट कार्ड बघून तुम्हाला या सामन्यातील थरार जाणवू शकतो. दोन्ही देशांचे 19 वर्षांखालील संघ आतापर्यंत 22 वेळा एकदिवसीय सामन्यांमध्ये भिडले आहेत, ज्यामध्ये भारताने 16 वेळा विजय मिळवला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने 6 वेळा विजय मिळवला आहे. म्हणजेच एकूणच लढतीत भारत खूप पुढे दिसतोय. पण, अंडर 19 विश्वचषकाचा विचार केला तर दक्षिण आफ्रिकेचे वर्चस्व राहिले आहे. अंडर 19 विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत 7 वेळा भिडले आहेत, ज्यामध्ये भारताने केवळ 3 वेळा विजय मिळवला आहे. म्हणजेच दक्षिण आफ्रिकेने 4 सामने जिंकले आहेत.
वेस्ट इंडिजमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच भिडणार
आज होणारा सामना वेस्ट इंडिजच्या मैदानावर दोन्ही संघांचा पहिला सामना असेल. भारतीय कर्णधार यश धुलही त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ प्रथमच दक्षिण आफ्रिकेच्या आव्हानाला सामोरे जाईल. म्हणजेच खूप नवीन अनुभव येणार आहेत. मात्र, भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांचा अलीकडचा विक्रम दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उत्कृष्ट राहिला आहे. 2020 पासून आतापर्यंत दोन्ही संघ दोनदा आमनेसामने आले आहेत आणि ते दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. अर्थात यश धुलच्या नेतृत्वाखाली हा विजय मिळवता आला नसला तरी भारतीय संघ आजच्या सामन्यात आत्मविश्वासाने उतरेल.
इतर बातम्या
IND vs SA: ‘बाहेरच्या लोकांना माहित नसतं, मैदानात काय…’, विराटचं DRS वादावर मोठ विधान
IND vs SA: ‘ओय एक मॅच तो अच्छा खेल के जाओ’, कॅच सुटली नेटीझन्सनी पुजाराची वाट लावली
(U19 World Cup, IND vs SA Head to Head records, India’s first match against South Africa)