Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup: भारताचा आयर्लंडवर मोठा विजय, 12 चेंडूत 48 धावा तडकावणारा हरनूर ठरला हिरो

यापूर्वी भारताची वर्ल्डकपमधील पहिली लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाली होती. तो सामना भारताने 45 धावांनी जिंकला होता. आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात कॅप्टन यश धुल खेळत नव्हता.

U19 World Cup: भारताचा आयर्लंडवर मोठा विजय, 12 चेंडूत 48 धावा तडकावणारा हरनूर ठरला हिरो
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 8:08 AM

गयाना: अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत (U19 World Cup) भारताचं दमदार प्रदर्शन कायम आहे. बुधवारी आयर्लंडला नमवून (Ireland U19) भारताने स्पर्धेतील दुसऱ्याविजयाची नोंद केली. या विजयासह भारताचा क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. यापूर्वी भारताची वर्ल्डकपमधील पहिली लढत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झाली होती. तो सामना भारताने 45 धावांनी जिंकला होता. आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात कॅप्टन यश धुल खेळत नव्हता. तरीही भारताने विजयी अभियान कायम राखले. दुसऱ्या सामन्यात यश धुलच्या (Yash dhull) जागी निशांत सिंधु कर्णधार होता.

आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. 50 षटकात भारताने पाच विकेट गमावून 307 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडचा संघ 133 धावात ढेपाळला. भारताने 174 धावांनी मोठ्या विजयाची नोंद केली. गोलंदाजांनी प्रभावी मारा केला. भारताने आठ गोलंदाजांना आजमावून पाहिले. त्यात सहा जण विकेट मिळवण्यात यशस्वी ठरले.

दमदार ओपनिंग आयर्लंडला विजयासाठी 307 धावांचे लक्ष्य देताना ओपनर हरनूर सिंह आणि अंगकृष रघुवंशीने महत्त्वाची भूमिका बजावली. दोघेही सलामीवीर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सलामीच्या सामन्यात अपयशी ठरले होते. पण आयर्लंड विरुद्ध विजयाची पायाभरणी करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. अंगकृष रघुवंशी 79 चेंडूत 79 धावा केल्या. यात 10 चौकार आणि दोन षटकार होते, तर हरनूर सिंहने 88 धावा केल्या. दोघांनी 164 धावांची सलामी दिली.

कॅप्टन यश धुल नसतानाही मधल्याफळीने जबाबदारी ओळखून खेळ केला. राजा बावाने 42, कॅप्टन निशांत सिंधुने 36 आणि राजवर्धन हंगरगेकरने 17 चेंडूत 39 धावा केल्या.

हरनूरने 12 चेंडूत तडकावल्या 48 धावा 101 चेंडूत 88 धावा करणारा हरनूर सिंह मॅचचा नायक ठरला. त्यालाच सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याने 12 चौकार लगावले. म्हणजे 12 चेंडूत त्याने 48 धावा तडकावल्या. हरनूर सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो स्वस्तात बाद झाला होता. पण पहिल्या सराव सामन्यात त्याने शतक झळकावले आहे. ग्रुप स्टेजमध्ये भारताचा सामना आता युगांडा बरोबर होईल.

संबंधित बातम्या: IND vs SA 1st ODI: ‘या’ तीन चुकांमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पराभव IND vs SA, 1st ODI: राहुलवर कॅप्टनशिपचा ‘साइड-इफेक्ट’, वेंकटेश अय्यरला बॉलिंग द्यायला विसरला IND vs SA, 1st ODI: कॅप्टन नाय म्हणून काय झालं? विराट कोहली थेट टेंबा बावुमालाच भिडला, पाहा VIDEO

U19 world cup india beat ireland by 174 runs harnoor singh shine with bat

वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?
वकील ओझा यांचे आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, काय म्हणाले आदित्य ठाकरे?.
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र
देवेंद्रजी, बात निकलेगी तो दूर तलक जायेगी; अंधारेंचं फडणवीसांना पत्र.
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.