U19 World Cup: 11 षटकार, 20 चौकार आणि 278 धावा… वॉर्मअप मॅचमध्ये भारताच्या युवा संघाने दाखवला पराक्रम
वेस्ट इंडिजची टीम संपूर्ण 50 षटकही खेळू शकली नाही. 43 षटकात 170 धावात त्यांचा डाव संपुष्टात आला. त्यांच्याकडून मॅथ्यू नंदू सर्वात यशस्वी फलंदाज ठरला.
नवी दिल्ली: अंडर 19 वर्ल्डकप (U19 World Cup) स्पर्धेला 14 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पण त्यााधीच या स्पर्धेचा ज्वर चढू लागला आहे. मुख्य स्पर्धेच्याआधी झालेल्या सराव सामन्यात (Wram-up Match) भारताच्या (India) युवा खेळाडूंनी आपला पराक्रम दाखवला. वॉर्मअप मॅचमध्ये भारताच्या अंडर 19 टीमचा सामना वेस्ट इंडिज बरोबर झाला. चार वेळच्या विश्वविजेत्यांकडून ज्या खेळाची अपेक्षा होती, तसाच खेळ भारताच्या युवा संघाने दाखवला. भारताच्या डावात चौकार-षटकारांचा पाऊस पडला. प्रत्येक खेळाडूने आपले योगदान दिले. (U19 World Cup India beat west indies yash dhull and sindhu star)
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने 50 षटकात 6 बाद 278 धावा केल्या. भारताने फलंदाजी करताना 11 षटकार आणि 20 चौकार लगावले. वेस्ट इंडिजपेक्षा भारतीय फलंदाजांनी तीन पट जास्त चौकार लगावले. त्यातून दोन संघांमधला फरक दिसून आला.
कर्णधार धुल आणि सिंधूचा जबरदस्त खेळ या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली होती. हरनूर आणि रघुवंशी हे दोन्ही सलामीवीर अवघ्या 17 धावात माघारी परतले होते. त्यानंतर कर्णधार यश धुलने सामन्याची सूत्र आपल्याहाती घेत आघाडीवर राहून नेतृत्व केलं. त्याने तिसऱ्या विकेटसाठी शाहीक रसीद सोबत अर्धशतकी भागीदारी रचली. कर्णधार यश धुलने 67 चेंडूत 52 धावा केल्या. यात सहा चौकार आणि दोन षटकार होते. भारतीय संघाकडून अराध्य यादवने सर्वाधिक पाच षटकार लगावून 42 चेंडूत 40 धावा केल्या. टॉप स्कोरर निशांत सिंधूने 76 चेंडूत 78 धावा केल्या. सिंधूने तीन षटकार आणि सात चौकार लगावले.
43 षटकात संपला वेस्ट इंडिजचा डाव भारताच्या 279 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारी वेस्ट इंडिजची टीम संपूर्ण 50 षटकही खेळू शकली नाही. 43 षटकात 170 धावात त्यांचा डाव संपुष्टात आला. त्यांच्याकडून मॅथ्यू नंदू सर्वात यशस्वी फलंदाज ठरला. त्याने 52 धावा केल्या. त्याच्याशिवाय कुठलाही फलंदाज अर्धशतकाची वेस ओलांडू शकला नाही. वेस्ट इंडिजचा या सामन्यात 108 धावांनी पराभव झाला. भारताकडून मानव प्रकाश आणि कौशल तांबेने प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय गर्ग सांगवान आणि अनिश्वर गौतमने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.
संबंधित बातम्या: IPL 2022: यंदाचा IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात? शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल मित्र धोनीसाठी धावून गेला जाडेजा, KKR ची बोलती केली बंद, IPL आरंभाआधीच सुरु झाली ठसन Jasprit Bumrah: केपटाऊन कसोटीआधी जसप्रीत बुमराह झाला भावूक, दिला खास संदेश
(U19 World Cup India beat west indies yash dhull and sindhu star)