IND vs WI: Rohit sharma ने कौतुक केलं, त्याच खेळाडूचा टीम मधून पत्ता कट
IND vs WI: वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजसाठी (IND vs WI) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.
मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्ध टी 20 सीरीजसाठी (IND vs WI) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. निवड समितीने 18 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. तीन खेळाडूंना आराम देण्यात आला आहे. एक मॅचविनर खेळाडूला संघात स्थान मिळालेलं नाही. उमरान मलिकला (Umran Malik) या सीरीजसाठी संघात स्थान मिळालेलं नाही. आयपीएल 2022 (IPL 2022) मधील शानदार प्रदर्शनानंतर या खेळाडूला संघात निवडण्यात आलं होतं. आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध उमरानला संघात संधी मिळाली. पण त्याला प्रभाव पाडता आला नाही. आता वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी त्याला संधी मिळालेली नाही. म्हणजे उमरान इंग्लंड वरुन थेट भारतात परतेल. त्याचे सहकारी वेस्ट इंडिजला रवाना होतील.
उमरानला का वगळलं?
उमरानला इंग्लंड आणि आयर्लंड सीरीज मध्ये तीन टी 20 सामने खेळण्याची संधी मिळाली. त्याने दोन विकेट काढले. प्रति ओव्हर त्याचा इकॉनमी रेट 12.44 होता. इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या टी 20 सामन्यात त्याने 4 ओव्हर्स मध्ये 56 धावा दिल्या.
Rohit Sharma (C), I Kishan, KL Rahul*, Suryakumar Yadav, D Hooda, S Iyer, D Karthik, R Pant, H Pandya, R Jadeja, Axar Patel, R Ashwin, R Bishnoi, Kuldeep Yadav*, B Kumar, Avesh Khan, Harshal Patel, Arshdeep Singh.
*Inclusion of KL Rahul & Kuldeep Yadav is subject to fitness.
— BCCI (@BCCI) July 14, 2022
रोहित शर्माच्या कौतुकानंतर उमरानला संघातून वगळलं
रोहित शर्माने सुद्धा उमरान मलिकच कौतुक केलं होतं. “उमरान आमच्या योजनेचा भाग आहे. उमरानला ज्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे, ते आम्ही त्याला समजावतोय. एक वेळ अशी येईल, जेव्हा आम्ही आमच्या युवा खेळाडूंना संधी देऊ. उमरान शानदार गोलंदाज आहे” असं रोहित म्हणाला होता. रोहित शर्माच्या कौतुकानंतर उमरानला संघातून वगळलं.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीचा भारतीय संघ
रोहित शर्मा (कप्तान), इशान किशन, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, आर अश्विन, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.