VIDEO: भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कॅप्टनची अमेरिकेत तुफान बॅटिंग, टीम फायनलमध्ये
तो अमेरिकेला निघून गेला होता. तो अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्स संघासाठी क्रिकेट खेळतोय. आपल्या शानदार फलंदाजीच्या बळावर उनमुक्त चंदने आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवलं आहे.
मुंबई: भारताला आपल्या नेतृत्वाखाली अंडर 19 वर्ल्ड कप (u 19 world cup) जिंकून देणारा कॅप्टन उनमुक्त चंद (unmukt chand) अमेरिकेत क्रिकेट खेळत (America Cricket) आहे. तो अमेरिकेच्या मेजर क्रिकेट लीग मध्ये सहभागी झाला आहे. उनमुक्त चंदने मागच्यावर्षी भारताकडून क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतला होता. तो अमेरिकेला निघून गेला होता. तो अमेरिकेत सिलिकॉन व्हॅली स्ट्रायकर्स संघासाठी क्रिकेट खेळतोय. आपल्या शानदार फलंदाजीच्या बळावर उनमुक्त चंदने आपल्या संघाला फायनलमध्ये पोहोचवलं आहे. चंदने शिकागो टायगर्स विरोधात खेळताना शानदार अर्धशतक झळकावलं.
शिकागोने प्रथम फलंदाजी करताना आठ विकेट गमावून 147 धावा केल्या. स्ट्रायकर्सच्या संघाने हे लक्ष्य 16.3 षटकात फक्त दोन विकेट गमावून पार केलं. या सामन्यानंतर स्ट्रायकर्सचा संघ फायनल मध्ये पोहोचला. अंतिम फेरीत त्यांचा सामना सीटर थंडरबोल्ट संघा विरुद्ध होईल.
उन्मुक्त चंदची नाबाद खेळी
148 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या स्ट्रायकर्सच्या संघाने चांगली सुरुवात केली. उन्मुक्त चंदसोबत राहुल जारीवाला फलंदाजीसाठी आला होता. दोघांनी मिळून 65 धावा जोडल्या. राहुल 27 धावा काढून आऊट झाला. उन्मुक्त चंद खेळपट्टीवर टिकून राहिला व तो सातत्याने धावा करत होता. राहुलनंतर शेहान जयासूर्याने 20 चेंडूत 27 धावा केल्या. त्यानंतर उन्मुक्त चंदला लँडल सिमन्सची साथ मिळाली. सिमन्सने नाबाद 17 धावा केल्या. तो उन्मुक्त चंद सोबत संघाला विजयी करुनच परतला. उन्मुक्त चंदने 54 चेंडूंचा सामना केला. त्याने आठ चौकारांशिवाय दोन शानदार षटकार लगावले. तो 71 धावांवर नाबाद राहिला.
Championship finals here we come.???@MiLCricket @usacricket @MLCricket .#blessed #minorleague2022 #usacricket #upwards #onwards #elevate #gratitude #siliconvalleystrikers #americancricket pic.twitter.com/bDtCoLeOUW
— Unmukt Chand (@UnmuktChand9) August 22, 2022
अशी होती शिकागोची इनिंग
प्रथम फलंदाजी करायला उतरलेला शिकागोचा संघ मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. त्यांचा एकही फलंदाज अर्धशतक झळकवू शकला नाही. सयैद साद अलीने 46 धावा केल्या. तीच संघाकडून सर्वोच्च धावसंख्या होती. तो 43 चेंडू खेळला. आपल्या इनिंग मध्ये त्याने पाच चौकार लगावले. त्याशिवाय काल्विन सॅवेजने 41 धावा केल्या. त्याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. करण कुमारने 27 चेंडूत 27 धावा केल्या. त्याने तीन चौकार खेचले. स्ट्रायकर्ससाठी जयसूर्याने तीन विकेट गेतल्या. कुलविंदर सिंहने दोन विकेट काढल्या.