Lana Rhoades: प्रेमात एडल्ट फिल्म स्टारची फसवणूक, स्टार प्लेयर मुलाचा पिता असल्याचा दावा
Lana Rhoades: अमेरिकेतील एक एडल्ट फिल्म स्टार लाना रोड्सने धक्कादायक खुलासा केला आहे. बास्केटबॉल प्लेयर तिच्या बाळाचा पिता असल्याचा दावा तिने केला आहे.
मुंबई: अमेरिकेतील एक एडल्ट फिल्म स्टार लाना रोड्सने धक्कादायक खुलासा केला आहे. बास्केटबॉल प्लेयर तिच्या बाळाचा पिता असल्याचा दावा तिने केला आहे. नॅशनल बास्केटबॉल असोशिएशनच्या खेळाडूंबद्दल माझ्या मनात एक चांगली प्रतिमा होती. पण वास्तव असं नाहीय. प्रेमात माझी फसवणूक झालीय, असं लाना रोड्सने म्हटलं. मागच्यावर्षी लाना रोड्सने ती प्रेग्नेंट असल्याचा खुलासा केला. तिने बाळाला जन्म दिला.
बाळाचा पिता कोण ?
या बाळाचा पिता कोण आहे? त्याचं नाव तिने अजून जाहीर केलेलं नाही. लाना रोड्स अमेरिकेतील एडल्ट स्टार आहे. स्टार बास्केटबॉल प्लेयर आपल्या बाळाचा पिता असल्याचा दावा लानाने केला आहे.
पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ एडल्टच असतात
लाना रोड्सने अलीकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला होता. एका युजरने तिला बाळाच्या पित्याबद्दल विचारलं. त्यावेळी लाना रोड्सने बाळाचा पिता बास्केटबॉल प्लेयर असल्याचा खुलासा केला. लाना रोड्सच्या पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ एडल्टच असतात.
मी देवाची शप्पथ घेऊन सांगते, की…
“मी देवाची शप्पथ घेऊन सांगते, NBA चे प्लेयर्स चांगले असतात, असं मी समजत होते. माझ्या मनात त्यांची एक चांगली प्रतिमा होती. मी त्याला सांगितलं की, मी प्रेग्नेंट आहे. ते ऐकताच त्याने मला शिवी घातली व तिथून निघून जायला सांगितलं” लाना रोड्सने तिचा हा अनुभव सांगितला.
दोन खेळाडूंवर संशय आहे
लाना रोड्सच्या या खुलाशानंतर फॅन्सची NBA च्या दोन खेळाडूंवर नजर आहे. ब्लॅक ग्रिफिन आणि केविन डुरंट या दोन खेळाडूंवर चाहत्यांना संशय आहे. या दोघांपैकी कोणी एक बाळाचा पिता असेल, असा फॅन्सचा संशय आहे. लानाने त्या खेळाडूच नाव सांगितलं नाही.