Rohit Sharma-राहुल द्रविडला सुनावणारा टीम इंडिया निवडणार? BCCI लवकरच घेणार मोठा निर्णय
कोण आहेत ते? या महिन्याच्या अखेरीस होऊ शकते सिलेक्टर्सची घोषणा.
ढाका: टी 20 वर्ल्ड कपआधी टीम इंडिया आपल्या निराशाजनक प्रदर्शनामुळे चाहत्यांच्या रडारवर होती. आधी आशिया कप त्यानंतर टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी केली. त्यामुळे चाहत्यांनी राहुल द्रविड आणि रोहित शर्मा या दिग्ग्जांना सुनावलं. माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादही या टीकाकारांमध्ये होते. रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांची रणनिती त्यांना बिलकुल आवडली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार आता वेंकटेश प्रसादच टीम इंडियाची निवड करु शकतात.
महिना अखेरीस सिलेक्टर्सची घोषणा
टी 20 वर्ल्ड कप 2022 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडने 10 विकेटने पराभव झाला. हा पराभव चांगलाच जिव्हारी लागणारा होता. त्यानंतर बीसीसीआयने निवड समितीला हटवण्याच मोठ पाऊल उचललं. बीसीसीआय या महिन्याच्या अखेरीस सिलेक्टर्सची घोषणा करेल. सिलेक्टरच्या पदासाठी ज्यांनी अर्ज केलाय, त्यात वेंकटेश प्रसाद सर्वात अनुभवी आहेत. त्यामुळे सिलेक्टर्स पदाच्या शर्यतीत ते आघाडीवर आहेत.
प्रसाद शर्यतीत आघाडीवर
53 वर्षांचे वेंकटेश प्रसाद टीम इंडियासाठी 33 टेस्ट आणि 161 वनडे सामने खेळले आहेत. त्यांच्या खात्यात 290 विकेट्स आहेत. पदासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये ते एक यशस्वी खेळाडू आहेत. अजून अधिकृत घोषणा झालेली नाही. पण ते शर्यतीत आघाडीवर आहेत. असं झाल्यास कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांच्या अडचणी वाढतील. प्रसाद रोहित आणि राहुल द्रविडच्या विचारांपासून फार प्रभावित नाहीयत. बांग्लादेश विरुद्ध पराभवानंतर त्यांनी दोघांना भरपूर सुनावलं.
India is innovating in so many fields across the world. But whn it comes to playing Limited overs cricket, our approach is a decade old. England after the 2015 WC first round exit took tough calls and turned around to become such an exciting team, India need to take tough calls..
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) December 7, 2022
राहुल-रोहितला सुनावलं
“भारत आज अनेक क्षेत्रात पुढे आहे. पण मर्यादीत षटकांच्या क्रिकेटचा विषय येतो, तेव्हा आपला अप्रोच 10 वर्ष जुना आहे. इंग्लंडने 2015 वर्ल्ड कपनंतर आपल्या विचारांमध्ये बदल केला. कठीण निर्णय घेतलेत. आता इंग्लंड एक शानदार टीम बनलीय. भारताला सुद्धा अशाच निर्णयांची आवश्यकता आहे. आयपीएल सुरु झाल्यानंतर भारताने एकही टी 20 वर्ल्ड कप जिंकलेला नाही. मागच्या पाच वर्षात द्विपक्षीय सीरीज जिंकण्याव्यतिरिक्त वनडेमध्ये आमचा रेकॉर्ड खराब आहे. आम्ही चूकांमधून काही शिकलो नाही. त्यामुळे आपण एक चांगली टीम निर्माण करु शकलेलो नाही” असं वेंकटेश प्रसादने म्हटलय.