सरावासाठी रोज पुणे-मुंबई प्रवास, भाड्याच्या घरात राहून सराव, लोणावळ्याच्या पठ्ठ्याचा U-19 World Cup मध्ये धुमाकूळ
भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) आपल्या अंडर-19 विश्वचषकाची (ICC U-19 World Cup) विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव केला होता.
पुणे : भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) आपल्या अंडर-19 विश्वचषकाची (ICC U-19 World Cup) विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात त्यांनी दक्षिण आफ्रिकेचा 45 धावांनी पराभव केला होता. भारताच्या विजयात डावखुरा फिरकी गोलंदाज विकी ओस्तवालने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने 10 षटके टाकली आणि 28 धावांत पाच बळी घेतले. त्याला या सामन्यानंतर सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले. विकीने आपल्या फिरकीच्या जोरावर द. आफ्रिकेच्या संघाला जेरीस आणलं होतं. मात्र त्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. सुरुवातीच्या काळात विकी सरावासाठी लोणावळ्याहून मुंबईत येत असे. तेही रोज. पुढे त्याला भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांच्या अकादमीत प्रवेश मिळाला आणि त्यानंतर या खेळाडूची क्रिकेट कारकीर्द वेगळ्या वाटेवर गेली. ऋतुराज गायकवाड या अकादमीतूनच उदयास आला आहे.
19 वर्षांखालील विश्वचषकात विकीच्या दमदार कामगिरीनंतर विकीचे प्रशिक्षक मोहन जाधव यांनी तो आणि त्याचे वडील यांच्या संघर्षाची आठवण करून दिली आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना जाधव म्हणाले, “कधी तो खूप लवकर यायचा तर कधी उशीरा, म्हणून मी त्याला विचारलं, तू कुठे राहतोस. विकीने लोणावळ्याला राहतो असे उत्तर दिले. तो ट्रेन ने ये-जा करत होता. ट्रेनमध्येच जेवायचा. सराव करुन परत जायचा. त्याची अर्धी ऊर्जा प्रवासात खर्च व्हायची, पण त्याने कधीच हार मानली नाही. तो मैदानावर नेहमी फ्रेश असायचा.
MCA चं कार्ड मिळालं नाही
विकीने मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्ड मिळवण्याचाही प्रयत्न केला पण त्याला त्यात यश आले नाही. जाधव म्हणाले, “तो मुंबईत खेळायचा. तो रोज प्रवास करायचा. कल्पना करा की एका लहान मुलाला एका बाजूला दोन – तीन तास प्रवास करावा लागतो. त्यामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे कार्ड घेण्यासाठी तो गेला पण त्यात त्याला यश मिळाले नाही कारण मुंबईत जन्मलेल्या लोकांनाच ते कार्ड मिळते. तेव्हा मला फोन आला की या मुलाला पुण्यात दाखल करुन घ्या.
त्यानंतर जाधव यांनी विक्कीच्या वडिलांना प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी पुण्यात भाड्याने घर घेण्याचा सल्ला दिला. त्याच्या वडिलांनी होकार दिला. त्यानंतर विकीने चिंचवड येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीतून आपला क्रिकेट प्रवास सुरू केला.
विक्कीमध्ये काय आहे खास?
जाधव म्हणाले की, विकीकडे उत्तम फ्लाईट आहे आणि तो एकाच जागेवर सतत चेंडू टाकू शकतो. “त्याचे नियंत्रण हेच त्याचे सामर्थ्य आहे. ज्युनियर सामन्यांमध्ये तो खूप यशस्वी झाला याचे कारण त्याचे नियंत्रण तसेच एकाच आणि योग्य ठिकाणी सातत्याने गोलंदाजी करणे. इतरांना पाहून तो खूप लवकर शिकतो.
??? ????: A winning start to India U19’s World Cup campaign as they beat SA U19 by 45 runs.
Vicky Ostwal takes ?-?? while Raj Bawa takes 4-47??
Details – https://t.co/WTnMdNWmzS#U19CWC #BoysInBlue #INDvSA pic.twitter.com/1dovovzbVU
— BCCI (@BCCI) January 15, 2022
इतर बातम्या
रोहित शर्मा होणार टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार, मात्र BCCI ची हिटमॅनसमोर महत्त्वाची अट
IND vs SA : एकदिवसीय मालिकेत कोणाचं पारडं जड? जाणून घ्या उभय संघांची आतापर्यंतची कामगिरी
(Vicky Ostwal’s coach recalls a boy who travelled daily from Lonavala to Mumbai for cricket Practice)