VIDEO: इरफान पठानच्या घरात विषारी साप घुसल्याने खळबळ
क्रिकेटच्या मैदानात इरफान आणि युसूफ पठानने आपल्या दमदार प्रदर्शनाने भरपूर नाव कमावलं. इरफान पठान आता कॉमेंट्री आणि सोशल मीडियावर सक्रीय असतो. याच पठान बंधुंच्या घरी अचानक एका पाहुणा घुसला.
मुंबई: क्रिकेटच्या मैदानात इरफान आणि युसूफ पठानने आपल्या दमदार प्रदर्शनाने भरपूर नाव कमावलं. इरफान पठान आता कॉमेंट्री आणि सोशल मीडियावर सक्रीय असतो. याच पठान बंधुंच्या घरी अचानक एका पाहुणा घुसला. ज्याच्या नुसत्या दर्शनाने एकच खळबळ उडाली. इरफान आणि युसूफ पठानच्या घरात एक साप सापडला आहे. हा साप आकाराने बराच मोठा होता. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी बराच वेळ लागला. बऱ्याचवेळा नंतर अखेर त्या सापाला पकडण्यात यश आलं. हा साप विषारी असण्याची दाट शक्यता आहे. सापाला पाहून कोण घाबरणार नाही. सापाला पाहून भल्या-भल्यांची भितीने गाळण उडते. इरफान पठानच्या घरात शिरलेल्या या सापाला पकडल्यानंतर लहान मुलं असो, वा वृद्ध प्रत्येकालाच त्याला जवळून पाहण्याची इच्छा होती.
सापाला पकडण्याचा व्हिडिओ इरफान पठानने केला शेयर
आकाराने मोठा, लांबलचक असलेला हा साप पठान बंधुंच्या घरच्या गार्डन एरियात आढळला. साप दिसल्यानंतर त्याला पकडण्यासाठी पठाण बंधुंनी सर्पमित्राला बोलावलं. या सापाला कसं नियंत्रणात आणून पकडलं, तो व्हिडिओ इरफान पठानने आपल्या सोशल मीडियावर शेयर केलाय.
View this post on Instagram
साप पकडणाऱ्याचे पठान बंधुंनी मानले आभार
साप आकाराने मोठा असल्याने तो प्रचंड हालचाल करत होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली. ज्या माणसाने या सापाला पकडलं, त्याचं नाव राज भास्कर आहे, इरफान पठानने ही माहिती दिली. भारतीय क्रिकेटमधील या दिग्ग्जाने राज भास्करचे मनापासून आभार मानले. कारण त्याच्यामुळे सापाला पकडता आलं. पावसाच्या दिवसात बऱ्याचदा साप आपल्या बिळातून बाहेर पडतात. काही वेळा हे साप घरात घुसतात. जिथे निवास शक्य आहे, तिथेच हे साप वास्तव्याला राहतात.