VIDEO: प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटपटू भडकला, मैदानात मारामारी करण्यासाठी धावला, अन्…..
मैदानात नेमकं काय घडलं? कशावरुन विषय मारामारीपर्यंत पोहोचला?
लाहोर: रावळपिंडीमध्ये पाकिस्तानी टीम इंग्लंड विरुद्ध टेस्ट मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतेय. त्याचवेळी रावळपिंडीपासून दूर एक प्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटपटू प्रेक्षकांना भिडला. सामना पहायला आलेल्या प्रेक्षकांशी त्याने वाद घातला. त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. हा खेळाडू पाकिस्तानी टीमचा अनुभवी वेगवान गोलंदाज हसन अली आहे. हसन अली सध्या पाकिस्तानी टीम बाहेर आहे. त्याचा एक व्हिडिओ समोर आलाय. त्याच्या वर्तनाने अनेकजण चक्रावून गेलेत.
मारहाणीपर्यंत पोहोचला विषय
28 वर्षाच्या हसन अली मागच्या काही काळापासून पाकिस्तानी टीममध्ये स्थान मिळत नाहीय. तो पाकिस्तानच्या टी 20 वर्ल्ड कप टीमचाही भाग नव्हता. इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतही तो खेळत नाहीय. मोकळ्यावेळेत तो स्थानिक टीमसाठी सामने खेळतोय. अशाच एका सामन्यात मारहाणीपर्यंत विषय पोहोचला.
प्रेक्षकांना भिडला हसन अली
हसन अली पंजाबच्या आरिफवाल येथे एक लोकल क्रिकेट टुर्नामेंट खेळण्यासाठी पोहोचला होता. तो सीमारेषेजवळ फिल्डिंग करत होता. त्याचवेळी सामना पहायला आलेल्या एका प्रेक्षकाने त्याला टोमणा मारला. 2021 टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये त्याच्याहातून कॅच सुटली होती. त्याचा आठवण करुन दिली. आता तरी कॅच पकड, असा प्रेक्षकांमधून टोमणा मारला जात होता. टीममध्ये स्थान नसल्याने काहीजण त्याची खिल्ली उडवत होते.
im deleting all memes i made on Hassan Ali.pic.twitter.com/6nto1CyqnD
— Abdullah (@michaelscottfc) December 3, 2022
हे टोमणे सहन झाले नाही
सध्या बॅड पॅचमध्ये असलेल्या हसन अलीला हे टोमणे सहन झाले नाहीत. सामन्यानंतर तो तिथे गेले व गर्दीत घुसून त्याने मारहाण सुरु केली. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी तिथे असलेल्या लोकांनी रोखलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. टि्वटरवर अनेक पाकिस्तानी फॅन्स हसन अलीच समर्थन करतायत.