MS Dhoni: धोनीच्या जुन्या मित्राने म्युझियमची काच फोडली; पहा VIDEO

हा खेळाडू IPL मध्ये धोनीच्या CSK संघाचा हिस्सा होता. पण यावेळी चेन्नई सुपर किंग्जने त्याला रिटेन केलेलं नाही.

MS Dhoni: धोनीच्या जुन्या मित्राने म्युझियमची काच फोडली; पहा VIDEO
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी भलेही क्रिकेटच्या मैदानापासून दूर असेल, पण सोशल मीडियावर तो नेहमीच ट्रेंडिंगमध्ये असतो. कधी त्याच्या लूकचे फोटो व्हायरल होतात तर कधी त्याचे पाळीव प्राण्यांसोबत खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल होत असतात.
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 11:23 PM

नवी दिल्ली: एमएस धोनीच्या (MS Dhoni) एका जुन्या मित्राने म्युझियमची काच फोडली. ही काच त्याने कुठल्या भांडणामुळे रागाच्या भरात नव्हे, तर बॅटने षटकार ठोकून फोडली. त्याने इतका लांबलचक षटकार ठोकला की, चेंडू थेट म्युझियममध्ये गेला. हे म्युझियम मैदानाबाहेर नव्हे, तर स्टेडियमचाच एक भाग आहे. षटकार ठोकून म्युझियमची काच फोडणाऱ्या या फलंदाजाचं नाव आहे, मिचेल सँटनर (Mitchell Santner). हा खेळाडू IPL मध्ये धोनीच्या CSK संघाचा हिस्सा होता. पण यावेळी चेन्नई सुपर किंग्जने सँटनरला रिटेन केलेलं नाही.

अशा धडाकेबाद फलंदाजीमुळे IPL 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये सँटनरला विकत घेण्यासाठी अनेक संघांमध्ये चुरस दिसू शकते. त्याला जास्त रक्कमेला विकत घेतले जाऊ शकते. पण सध्या सँटनर 35 चेंडूतील त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे आणि त्या षटकारामुळे चर्चेत आहे. सँटनरच्या त्या षटकाराने म्युझियमची काच फोडली व चेंडूही हरवला.

धोनीने ज्याला सोडलं, त्यानेच षटकार ठोकला न्यूझीलंडचा ऑलराऊंडर मिचेल सँटनर सुपर स्मॅश स्पर्धेत नॉर्दर्न नाइट्सकडून खेळतो. त्याने 14 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर तो षटकार लगावला. वेलिंगटन फायरबर्ड्सचा गोलंदाज बेन सियर्सच्या चेंडूवर त्याने हा षटकार ठोकला. चेंडू थेट स्टेडियममध्ये बनवलेल्या म्युझियमनच्या काचेवर जाऊन आदळला. काचही फुटली आणि बॉलही हरवला. पंचांना दुसरा चेंडू मागवावा लागला.

सहा षटकार ठोकले सँटनरने षटकार ठोकला, तेव्हा तो 42 धावांवर खेळत होता. सँटनरने आक्रमक फलंदाजी करताना 35 चेंडूत 59 धावा तडकावल्या. यात सहा चौकार आणि पाच षटकार होते. डावखुऱ्या सँटनरच्या फलंदाजीमुळे नॉर्दर्न नाइट्सने 168 धावांचे लक्ष्य आरामात पार करुन वेलिंगटन फायरबर्डसला दोन विकेटने हरवलं.

'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.