Vinod Kambli health news: विनोद कांबळीची प्रकृती अजूनही अस्थिर, मदतीशिवाय चालने अवघड, व्हिडिओ पाहून चाहते चिंतेत
Vinod Kambli Health Update: विनोद कांबळी यांनी सुरुवातीला मूत्रमार्गात संसर्ग आणि वेदना असल्याची तक्रार केली होती. विनोद कांबळी यांना ताप होता. तसेच स्नायू दुखणे आणि चक्कर आल्याने मागील
Vinod Kambli Health Update: भारतीय क्रिकेट संघातील माजी खेळाडू विनोद कांबळी रुग्णालयात दाखल आहे. त्यांची प्रकृती अजूनही पूर्णपणे बरी झाली नाही. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. त्यांच्या स्मृती भ्रम अजूनही बरा झालेला नाही. कांबळी यांच्यावर उपचार करणारे डॉ. विवेक द्विवेदी यांनी त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. परंतु त्यांचा समोर आलेला व्हिडिओ अजूनही प्रकृती अस्थिर असल्याचे दर्शवत आहे. त्यांना मदतीशिवाय चालताही येत नसल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे.
विनोद कांबळी यांचा आजाराचे मुख्य कारण दारुची सवय आहे. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी दारु सोडली आहे. डॉक्टर म्हणतात, विनोद कांबळी यांना दोन वेळा फिजियोथेरेपी, न्यूट्रिशनल सपोर्ट आणि स्पीच थेरेपीची गरज आहे. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होईल. कांबळी यांना पूर्ण बरे होण्यासाठी सातत्याने उपचार गरजेचे आहे.
विनोद कांबळी यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे शिवसेना नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाकडून पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच कांबळी यांच्या पाठिशी पूर्णपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. ठाणे येथील आकृती हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार होत आहे. रुग्णालयाने त्यांच्याकडून कोणतेही बिल न घेण्याचाही निर्णय घेतला आहे.
Worrying Health Update on Vinod Kambli: Brain Condition Unstable
▶️ Admitted to Aakriti Hospital with high-grade fever, muscle cramps, and dizziness.
▶️ Diagnosed with degenerative brain changes and old clots from a recent stroke.
▶️ ICU care for low BP, sodium, and potassium… pic.twitter.com/oh506i47Fv
— Sneha Mordani (@snehamordani) December 27, 2024
असे आहे प्रकृतीचे अपडेट
विनोद कांबळी यांनी सुरुवातीला मूत्रमार्गात संसर्ग आणि वेदना असल्याची तक्रार केली होती. विनोद कांबळी यांना ताप होता. तसेच स्नायू दुखणे आणि चक्कर आल्याने मागील आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्यांना स्मृती भ्रमही झाला आहे. तो अजूनही पूर्णपणे बरा झाला नाही. तसेच कमी रक्तदाब, सोडियम आणि पोटॅशियमच्या कमतरतेवरही उपचार केले जात आहे. आता येत्या 2-3 दिवसात डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा…
विनोद कांबळी यांना झालेला आजार कोणता? त्या आजाराची कारणे अन् लक्षणे कोणती? किती गंभीर आहे हा आजार?