Virat kohli 100 th Test match: धोनी विराटला सहज बाहेर करु शकला असता, पण… पर्थ कसोटीने बदललं कोहलीचं नशीब आणि करीयर
Virat kohli 100 th Test match: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज आपल्या करीयरमधील 100 वा कसोटी सामना खेळणार आहे.
Virat kohli 100 th Test match: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज आपल्या करीयरमधील 100 वा कसोटी सामना खेळणार आहे. 100 वा कसोटी सामना खेळणारा विराट 12 वा भारतीय क्रिकेटपटू आहे. याआधी सचिन तेंडुलकर, (Sachin Tendulkar) राहुल द्रविड, (Rahul dravid) वीवीएस लक्ष्मण, अनिल कुंबळे. कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, सौरव गांगुली, इशांत शर्मा, विरेंद्र सेहवाग आणि हरभजन सिंग 100 कसोटी सामने खेळले आहेत. विराटने आज जो पल्ला गाठलाय, त्यात 2012 सालच्या पर्थ कसोटीचा महत्त्वाचा रोल आहे. पर्थ कसोटीत भारताचा पराभव झाला होता. पण पराभवानंतरही विराटचं कसोटी करीयर वाचलं होतं. विराटच्या करीयरसाठी ही कसोटी निर्णायक ठरली होती.
नेमकं काय घडलं होतं त्यावेळी?
2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकप जिंकला. संपूर्ण देशात त्यावेळी वर्ल्डकप विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. वर्ल्डकपनंतर आयपीएल स्पर्धा होती. आयपीएल दौऱ्यानंतर वेस्ट इंडिजचा दौरा होता. विराट कोहलीची कसोटी संघात निवड झाली होती. जमैकाच्या ऐतिहासिक मैदानावर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सुरुवात खराब झाली. स्कोर बोर्डवर पन्नास धावा लागेपर्यंत संपूर्ण टॉप आर्डर पॅव्हेलियनमध्ये परतलं होतं.
विराटच्या कसोटी करीयरची सुरुवात
त्या अवघड प्रसंगात टीम अडचणीत असताना विराट कोहलीच्या कसोटी करीयरची सुरुवात झाली. विराटच्या 10 चेंडूत चार धावा झाल्या होत्या. फिडेल एडवर्ड्सचा एक बाहेर जाणारा चेंडू खेळण्याच्या प्रयत्नात विराटने यष्ठीपाठी झेल दिला. दुसऱ्याडावातही तो अपयशी ठरला. विराटने कशीबशी दोन आकडी धावसंख्या गाठली. पण त्यानंतर 15 धावसंख्येवर तो आऊट झाला. या सामन्यात राहुल द्रविडची शानदार फलंदाजी आणि इशांत शर्मा-प्रवीण कुमारच्या घातक गोलंदाजीच्या बळावर भारताने कसोटी सामना जिंकला.
दुसऱ्या-तिसऱ्या कसोटीतही फ्लॉप
बारबाडोसमध्ये खेळला गेलेला दुसरा कसोटी सामना ड्रॉ झाला. पहिल्या डावात विराट कोहली शुन्यावर आऊट झाला. दुसऱ्याडावात 27 धावांवर स्लीपमध्ये झेल दिला. तिसऱ्या कसोटीतही पहिल्या डावात विराट 30 धावांवर आऊट झाला. दुसऱ्याडावात फलंदाजाची संधीच मिळाली नाही. पहिल्या मालिकेत विराट फ्लॉप ठरला होता. त्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ भारत दौऱ्यावर आला. विराटला मुंबईत खेळण्याची संधी मिळाली. त्याने दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली. पण हा आनंद फारकाळ टिकला नाही.
ऑस्ट्रेलियात सुरु झाला संघर्ष
त्यानंतर भारताचा पुढचा दौरा ऑस्ट्रेलियाचा होता. या मालिकेत विराट कोहली संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला. पण ऑस्ट्रेलियाच्या वेगवान खेळपट्टयांवर विकेट टिकवून खेळताना त्याला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. मेलबर्न कसोटीपासून त्याची परीक्षा सुरु झाली. पहिल्या डावात विराट 11 धावांवर आऊट झाला. दुसऱ्याडावात विजयासाठी 292 धावांची आवश्यकता होती. पण भारतीय संघाने फक्त 169 धावा केल्या. विराट कोहली, तर खातही उघडू शकला नाही.
धोनी विराटला सहज बाहेर करु शकल असता, पण…
दुसऱ्या सिडनी कसोटीत भारताचा डावाने पराभव झाला. सिडनी कसोटीच्या पहिल्या डावात भारताने 23 आणि दुसऱ्याडावात 9 धावा केल्या. करीयरच्या पहिल्या सहा कसोटी सामन्यात विराट फार काही करु शकला नव्हता. विराट कोहलीवर दबाव वाढला होता. विराटला अजून किती संधी द्यायची? यावर भारतीय मीडियामध्ये चर्चा सुरु झाली होती. तिसऱ्या कसोटीत प्लेइंग इलेवनमध्ये बदल झाला पाहिजे, अशी मागणी त्यावेळी सुरु झाली होती. विराट कोहलीला संघाबाहेर करण्यासाठी धोनीकडे प्रबळ कारण होतं. तो सहज विराटला संघाबाहेर करु शकत होता. पण धोनीने विराटला आणखी एक कसोटी खेळण्याची संधी दिली. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर तिसरा सामना होता. त्या कसोटीत विराटने आपली कामगिरी उंचावली. भारताने हा कसोटी सामना गमावला. पण दोन्ही डावात भारताकडून विराटने सर्वाधिक धावा केल्या. विराटने पहिल्याडावात 44 आणि दुसऱ्याडावात 75 धावा केल्या. त्यानंतर जे घडलं, तो वेगळा इतिहास आहे. विराट कोहलीने पुढच्या 10 कसोटी सामन्यात चार कसोटी शतक आणि तीन अर्धशतक झळकावली.
Virat kohli 100 th Test match india vs sri lanka 1st test virat transformed from perth test 10 years ago