अरे, Virat Kohli-इशान किशन काय जबरदस्त नाचले, एकदा हा VIDEO बघा
विराटही मस्ती करण्यासाठी ओळखला जातो. याआधी सुद्धा तो डान्स करताना दिसलाय. जिथे डान्स करण्याची संधी मिळते, तिथे विराट कधीही मागे नसतो.
कोलकाता: टीम इंडिया सध्या सध्या श्रीलंकेविरुद्ध तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळत आहे. या सीरीजमधला एक सामना बाकी आहे. पण टीम इंडियाने मालिकेत आधीच 2-0 विजयी आघाडी घेतली आहे. गुरुवारी कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर सामना झाला. श्रीलंकेविरुद्धची ही मॅच टीम इंडियाने 4 विकेट राखून जिंकली. या विजयासह टीम इंडियाने सीरीज जिंकली. संपूर्ण टीमने या विजयाच सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यात विराट कोहली आणि युवा बॅट्समन इशान किशन जोरदार डान्स करताना दिसले.
अशी जिंकली टीम इंडिया
टीम इंडियाने या मॅचमध्ये श्रीलंकेला मोठी धावसंख्या उभारु दिली नाही. श्रीलंकेच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 39.4 ओव्हर्समध्ये फक्त 215 धावा केल्या. टीम इंडियाला लक्ष्याचा पाठलाग करताना थोडी अडचण झाली. पण केएल राहुलने नाबाद 64 धावा केल्या. त्या बळावर टीम इंडियाने 43.2 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून लक्ष्य गाठलं.
Virat Kohli and Ishan Kishan dancing after the yesterday’s ODI series win at Eden Gardens! pic.twitter.com/pV6BvsFIIZ
— CricketMAN2 (@ImTanujSingh) January 13, 2023
मॅचनंतर विराट-इशान थिरकले
या विजयानंतर टीम इंडियाने सीरीज जिंकली आहे. विजयानंतर भारतीय खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन केलं. सोशल मीडियावर या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल होतोय. यात विराट कोहली आणि इशान किशन मस्तीच्या मूडमध्ये दिसतायत. दोन्ही खेळाडू डान्स करताना दिसतात. विराटही मस्ती करण्यासाठी ओळखला जातो. याआधी सुद्धा तो डान्स करताना दिसलाय. जिथे डान्स करण्याची संधी मिळते, तिथे विराट कधीही मागे नसतो. यावेळी त्याला इशान किशनची साथ मिळाली. दोघांनी भरपूर मस्ती केली. विराटसाठी चांगली सीरीज
विराटसाठी ही सीरीज चांगली ठरलीय. त्याने गुवाहाटीच्या पहिल्या वनडे सामन्यात शतकी खेळी केली होती. चार वर्षानंतर त्याचं भारतातील हे पहिलं शतक आहे. दुसऱ्या सामन्यात विराट काही खास करु शकला नाही. तो चार रन्सवर बाद झाला. इशान किशनला अजूनपर्यंत दोन्ही मॅचमध्ये संधी मिळालेली नाही. इशानने बांग्लादेश विरुद्ध शेवटच्या वनडे मॅचमध्ये डबल सेंच्युरी झळकवली होती. वेगवान डबल सेंच्युरी झळकवणारा तो पहिला फलंदाज आहे.