IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर विराट आणि रोहितचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO

भारतीय गोलंदाजांनी 51.5 षटकांमध्ये अवघ्या 120 धावांत इंग्लंडचे सर्व फलंदाज बाद करत लॉर्ड्स कसोटी खिशात घातली. या रोमहर्षक सामन्यात विजयानंतर सर्वच संघ अतिशय आनंदात दिसत होता.

IND vs ENG : लॉर्ड्सवरील विजयानंतर विराट आणि रोहितचा आनंद गगनात मावेना, पाहा VIDEO
भारताचा लॉर्ड्सवर विजय
Follow us
| Updated on: Aug 17, 2021 | 11:30 AM

लंडन : क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या (Lord’s) मैदानात अखेर भारताने इंग्लंडवर दमदार विजय मिळवला. सामन्यात सुरुवातीला फलंदाजाच्या निराशाजनक कामगिरीमुळे सामना अनिर्णीत करण्यासाठीच भारत खेळत आहे, असे वाटत होते. पण सामन्याच्या अखेरच्या डावात भारतीय संघाने पुन्हा गरुडभरारी घेत सामन्यात दमदार विजय मिळवला. ज्यासोबत 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतही 1-0 ची आघाडी घेतली. 2007 मध्ये अखेरची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये जिंकल्यानंतर पुन्हा एकदा त्या दिशेने भारताच्या टोळीने आगेकुच केली आहे.

या विजयात सर्वच खेळाडूंनी आपल्यापरीने योगदान दिले. पहिल्या डावात राहुल आणि रोहित जोडीची अप्रतिम सुरुवात. सर्वच गोलंदाजाची उत्तम कामगिरी. त्यानंतर दुसऱ्या डावात रहाणेचं अर्धशतक, पुजाराची साथ आणि शमी-बुमराह जोडीची तुफान फलंदाजी. या सर्वांनी इंग्लंडसमोर अखेरच्या दिवशी 272 धावांचे लक्ष्य ठेवले. जे पार करताना सिराज आणि बुमराह यांनी इंग्लंडच्या फलंदाजाना सळो की पळो केलं. ज्यामुळे भारताने 151 धावांनी दमदार विजय मिळवला. विजयानंतर सर्वच संघ जोशात होता, आनंदात अक्षरश: नाचत होता. त्याचवेळी संघातील दिग्गज खेळाडू  विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचा आनंदही गगनात मावत नव्हता. सामना जिंकताच क्षणी कोहलीची नजर जशी रोहितवर पडते दोघेही एकमेंकाना आनंदात मिठी मारतात. या सुंदर क्षणांना कॅमेऱ्यात कैद केल्याने हा आनंद साजरा करतानाचा VIDEO व्हायरल होत आहे.

सामन्यात प्रत्येक खेळाडूचं योगदान

पहिल्या डावात लोकेश राहुलने शतक ठोकलं. तर रोहित शर्माने 83 धावांची जबरदस्त खेळी केली. तर दुसऱ्या डावात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने चिवट फलंदाजी करत शतकी भागीदारी केली. रहाणेने मोठ्या कालावधीनंतर अर्धशतक ठोकलं. तसेच अखेरच्या सत्रात मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमरहाने मोठी भागीदारी करत भारताच्या डावाला आकार दिला. तसेच गोलंदाजांनीदेखील दोन्ही डावात निर्णायक भूमिका बजावली. पहिल्या डावात मोहम्मद सिराजने 4, इशांत शर्माने 3, मोहम्मद शमीने 2 बळी घेतले. तर दुसऱ्या डावात सिराजने पुन्हा एकदा 4 विकेट घेतल्या. बुमराहने 3, इशांतने 2 आणि शमीने 1 विकेट घेतली.

इतर बातम्या

IND vs ENG : बुमराह नडला, सिराज लॉर्ड्सवर थेट भिडला, भारताचा इंग्लंडवर थरारक विजय

IPL 2021: राशिद खान आणि मोहम्मद नबी यांच्या आयपीएलमध्ये खेळण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर, हैद्राबाद संघाच्या CEO ने दिली माहिती

IND vs ENG : शर्मा आणि कोहली मैदानाबाहेरुन पंतच्या मदतीला, खराब प्रकाशमानामुळे खेळ थांबवण्याचा सल्ला देतानाचा भन्नाट VIDEO व्हायरल

(Virat Kohli and rohit sharma looks so happy after india win vs england at lords test)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.