रोहित, विराटच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर ड्रेसिंग रूममध्ये नेमके काय घडले, सूर्यकुमार यादवने सांगितली इनसाईड स्टोरी

Virat Kohli-Rohit Sharma Retirement: विश्वविजेते बनल्यानंतर निवृत्ती घेणे अवघड असते. संघाला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कमतरता जाणवणार आहे. टी-20 विश्वचषकात विराट कोहली अंतिम सामन्यात सामनावीर ठरला.

रोहित, विराटच्या निवृत्तीच्या निर्णयानंतर ड्रेसिंग रूममध्ये नेमके काय घडले, सूर्यकुमार यादवने सांगितली इनसाईड स्टोरी
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 9:18 AM

भारतीय टीमने शनिवार टी-20 विश्वकप जिंकला. त्यानंतर संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. देशभरातील अनेक ठिकाणी पाऊस सुरु असताना क्रिकेटप्रेमी रस्त्यावर उतरले. त्यांनी जल्लोष सुरु केला. त्याचवेळी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी क्रिकेटप्रेमींना धक्का दिला. त्यांनी टी-20 मधून निवृत्ती जाहीर केली. रोहित-विराटच्या जोडीला हा धक्का होता. दोन्ही खेळाडूंनी यासंदर्भात कधी विचार केला? कधी निर्णय घेतला? सहकाऱ्यांशी चर्चा केली का? यासंदर्भात सूर्यकुमार यादव याने एका वृत्तवाहिनीला सांगितले. ड्रेसिंग रुममध्ये या निर्णयानंतर काय घडले, ते सूर्यकुमार यादव याने सांगितले.

काय घडले ड्रेसिंगरुममध्ये

सूर्यकुमार यादव याने सांगितले की, दोघांची टी-20 मधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघांना या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न सुरु झाला. त्यांना आणखी एक मोठी टुर्नामेंट खेळावी, असा आग्रह सहकारी खेळाडूंनी सुरु केला. परंतु रोहित आणि विराट हे दोन्ही खेळाडू आपल्या निर्णयावर ठाम होते.

ड्रेसिंगरुममधील वातावरण बदलले

सूर्यकुमार यादव यांनी सांगितले की, टीम चॅम्पियन बनल्यानंतर ड्रेसिंगरुममध्ये आनंदाचे वातावरण होते. परंतु विराट आणि रोहित याच्या निर्णयानंतर ड्रेसिंगरुममधील आनंदाचे वातावरण भावनिक झाले. सर्व जण इमोशनल झाले. आता हा निर्णय घेऊ नका. पुढील वर्ल्डकप भारतात होणार आहे. अजून दीड ते दोन वर्ष खेळा. त्यानंतर हा निर्णय घ्या, असे त्यांना सर्व जण सांगू लागले. परंतु दोन्ही खेळाडूंनी आपला निर्णय ठरवला होता. त्यापासून माघार घेण्यास ते तयार नव्हते. दोघांनी आपला निर्णय ठरवला होता.

हे सुद्धा वाचा

हा निर्णय घेणे अवघड

सूर्यकुमार यादव म्हणाला, विश्वविजेते बनल्यानंतर निवृत्ती घेणे अवघड असते. संघाला विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कमतरता जाणवणार आहे. टी-20 विश्वचषकात विराट कोहली अंतिम सामन्यात सामनावीर ठरला. त्यापूर्वी इतर सर्व सामन्यात तो फलंदाजीत चमक दाखवू शकला नव्हता. परंतु अंतिम सामन्यात विराट कोहलीने केलेल्या खेळीमुळे भारत विजयी झाला.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.