नो शुगर, स्पेशल डाएट, फॉर्म परत मिळवण्यासाठी जाणून घ्या, Virat Kohli काय करतोय?
विराट कोहलीने सध्या स्पेशल डाएट (Diet) आणि व्यायाम प्रकारांवर लक्ष केंद्रीत केलय. तो 3 तासापेक्षा जास्त वेळ नेट मध्ये घालवतोय. कोहलीचा दिनक्रम सध्या कसा आहे, ते जाणून घ्या.
मुंबई: भारताचा माजी कर्णधार (Former captain) विराट कोहलीचा (Virat kohli) फॉर्म हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. आगामी आशिया कप स्पर्धेद्वारे आपला फॉर्म परत मिळवण्यासाठी विराट कोहली त्याच्याबाजूने शक्य ती सर्व मेहनत करतोय. विराट कोहलीने सध्या स्पेशल डाएट (Diet) आणि व्यायाम प्रकारांवर लक्ष केंद्रीत केलय. तो 3 तासापेक्षा जास्त वेळ नेट मध्ये घालवतोय. कोहलीचा दिनक्रम सध्या कसा आहे, ते जाणून घ्या.
विराट कोहलीचा डाएट प्लान: फॉर्म परत मिळवण्यासाठी विराट कोहली मैदानावर आणि मैदानाबाहेर मेहनत घेतोय. विराटने सध्या त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल केला आहे. फिट रहाण्यासाठी विराट प्रक्रियायुक्त साखरेचे आणि ग्ल्युटेन असलेले पदार्थ टाळतोय. नेहमीच्या फिटनेस रुटीन मध्येही विराट दुधापासून बनलेले पदार्थ खाणं टाळतो.
जीम रुटीन: विराटने जीम मध्ये वजन उचलतानाचे व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले होते. भारतात परतल्यापासून विराटने त्याच्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत केलय. RCB चे कोच संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली विराट सध्या बीकेसी मध्ये सराव करतोय. घरातच बनवलेल्या जीम मध्ये तो फिटनेसवर काम करतो.
विराट त्याच्या फिटनेसबद्दल काय म्हणाला?
“अशी एक वेळ होती, जेव्हा मी माझ्या डाएट आणि फिटनेसवर फार लक्ष देत नव्हतो. पण मागच्या काही वर्षात मी माझ्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल केले आहेत. त्यात मी एक शिस्त आणलीय. मी जे खातोय, त्या बद्दल मी आता जागरुक असतो. काय करायचं आणि काय नाही, हे माझ्यासाठी आता सोप बनलय. प्रक्रियायुक्त साखरेचे आणि ग्ल्युटेन पदार्थ मी टाळतो. डेअरी उत्पादन सुद्धा मी शक्य तितकी टाळतो” असं विराट द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाला.
आशिया कप स्पर्धेसाठी UAE ला जाण्याआधी पुढच्या आठवड्यात टीम इंडियाचा राष्ट्रीय क्रिकेट प्रबोधिनीत कॅम्प आहे. सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी रवाना होण्याआधी फिटनेस टेस्ट मध्ये पास व्हावच लागेल. विराट कोहलीच्या बॅटमधून मागच्या दोन वर्षात शतक निघालेलं नाही. संघातील त्याच्या स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे ही सीरीज त्याच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.