Virat Kohli Century IPL 2023 : विराटच्या शतकानंतर LSG ने जे केलं, त्याची सर्वत्र चर्चा, VIDEO
Virat Kohli Century IPL 2023 : विराटची टीम RCB आणि गौतम गंभीरच्या LSG मध्ये मोठा खुन्नस आहे. नवीनच्या पोस्टवर गंभीरने काही सेकंदात रिएक्शन दिली होती. सोशल मीडियावर सेकंदात रिएक्ट होणारा गंभीर आता विराटच्या शतकानंतर काय करणार?
नवी दिल्ली : Virat Kohli ची 1490 दिवसांपासूनची प्रतिक्षा अखेर काल संपुष्टात आली. त्याने सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध शानदार शतक झळकावलं. जवळपास 4 वर्षानंतर विराटने आयपीएलमध्ये शतक झळकावल आहे. या सेंच्युरीनंतर विराटवर चहूबाजूंनी कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. सचिन तेंडुलकर, एबी डिविलियर्ससह अनेक क्रिकेटपटूंनी कोहलीच कौतुक केलय. त्याने 63 चेंडूत शानदार 100 धावा फटकावल्या.
कोहलीच्या शतकानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु असताना एका टि्वटची खूप चर्चा आहे. हे टि्वट लखनऊ सुपर जायंट्सच्या टीमने केलय. काही दिवसांपूर्वी मॅचनंतर RCB आणि LSG चे खेळाडू भिडले होते.
विराटच्या शतकावर लखनऊची प्रतिक्रिया
विराट कोहलीच मैदानातच गौतम गंभीरसह लखनऊच्या अन्य खेळाडूंबरोबर वाजलं होतं. आता विराटच्या शतकावर लखनऊची प्रतिक्रिया आली आहे. त्यामुळे याची चर्चा होणं स्वाभाविक आहे. क्रिकेट विश्वातून कोहलीच कौतुक सुरु असताना, लखनऊने सुद्धा त्याचं कौतुक केलं. विराट कोहली सर्वोत्तम असं लखनऊने त्यांच्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.
? Bow down to the greatness of ? #ViratKohli ?
He is now tied with Chris Gayle for the most #TATAIPL hundreds ?#SRHvRCB #IPLonJioCinema #IPL2023 #EveryGameMatters pic.twitter.com/OGxWztuhk6
— JioCinema (@JioCinema) May 18, 2023
कोहलीच्या शतकावर गंभीर काय बोलणार?
आता सर्वांनाच गौतम गंभीरच्या रिएक्शनची प्रतिक्षा आहे. गौतम गंभीर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात एक्टिव असतो. चांगल्या इनिंगच तो कौतुक करतो. आता कोहलीच्या शतकावर काय बोलणार? याची उत्सुक्ता आहे.
Virat Kohli at his best. ??
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) May 18, 2023
ट्रोलर्सच्या रडारवर गंभीर
कोहलीच्या सेंच्युरीनंतर गंभीर ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. विराट कोहली आणि गौतम गंभीर 1 मे रोजी मैदानात भिडले होते. लखनौ आणि RCB च्या सामन्यात हा सर्व वाद झाला होता. नवीन उल हकपासून या वादाला सुरुवात झाली होती. गंभीरने या भांडणात उडी घेतली होती. विराट आणि गंभीरला दूर करण्यासाठी अन्य खेळाडूंना हस्तक्षेप कराव लागलं होतं. नवीन उल हकच्या पोस्टमुळे हा वाद शमला नाही
लखनऊचा मेंटॉर गौतम गंभीर आणि विराट कोहलीच्या मॅच फी मधून 100 टक्के रक्कम कापण्यात आली होती. मैदानातील या भांडणानंतर सोशल मीडियावर कोल्ड वॉर सुरु झालं होतं. नवीन उल हकच्या पोस्टमुळे हा वाद शमला नाही. नवीनच्या पोस्टवर गंभीरने काही सेकंदात रिएक्शन दिली होती. सोशल मीडियावर सेकंदात रिएक्ट होणारा गंभीर आता विराटच्या शतकानंतर काय करणार?